eassy on my favourite bird peacock in marathi easy
Answers
Answer:
➡मोर हा पक्षी आहे ज्याला भारतात प्रचंड राष्ट्रीय महत्त्व आहे. सर्वात उल्लेखनीय म्हणजे, पक्षी त्याच्या सुंदर दोलायमान रंगांसाठी प्रसिद्ध आहे. मोर त्याच्या नेत्रदीपक सौंदर्यासाठी लोकप्रिय आहे. यात निश्चितपणे संमोहन स्वरूप आहे. पावसाळ्यात हे नाचताना पाहणे खूप आनंददायक अनुभव आहे. त्याचे सुंदर रंग त्वरित डोळ्यांना आराम देतात. भारतीय परंपरेत मोराचा धार्मिक सहभाग आहे. यामुळे मोराला भारतीय राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले...
▶धन्यवाद◀
here u go..
आमच्या भारत देशामध्ये विविध प्रकारचे पक्षी आढळतात. जसे कि पोपट, मैना, कबुतर, चिमणी, कावळा इ. त्या सर्वांपैकी मोर हा पृथ्वीवर एक सुंदर पक्षी आहे.
हा पक्षी त्याच्या रंगबिरंगी पंखांमुळे ओळखला जातो. मोर हा पक्षी भारतामध्ये अन्य भागांमध्ये आढळून येतो.
मोर हा पक्षी विविध रंगांमध्ये आढळतो. तसेच भारतीय लोकांसाठी मोराचे राष्ट्रीय महत्त्व आहे. भारतच्या इतिहासात मोराला सर्वात महत्वाच स्थान आहे
मोर हे दिसायला खूप सुंदर असतात. मोर दिसायला चमकदार हिरवट – निळ्या रंगाचे असतात. मोराची मान ही लांब आणि सुंदर असते आणि गडद निळ्या रंगाची असते. मोराचे वय हे २० – २५ वर्ष एवढे असते.
मोराच्या पिसांवर चंद्रासारखे ठिपके असतात जे दिसायला खूप सुंदर दिसतात. जसे कि सोनेरी, पिवळ्या, हिरव्या आणि निळ्या अशा विविध रागांची रंगछटा असते. मोराच्या डोक्यावर तुरा असतो.
शेतकऱ्याचे मोरावर खूप प्रेम असते. कारण मोर हा शेतकऱ्याचा चांगला मित्र सुद्धा असतो. मोर हा पक्षी हिरव्या शेतात जास्त प्रमाणात दिसून येतो.
मोर हा पक्षी शेताला नुकसान पोहोचवणाऱ्या उंदीर, किडे आणि बेडूक साप यांना खातो. त्यामुळे शेताचे नुकसान होत नाही. तसेच मोर या पक्ष्याला ढग फार आवडतात......
मोर हा पक्षी जास्त प्रमाणात वृक्ष असलेल्या तसेच पहाडावर व जंगलात राहतात. ते जवळील पाण्याची जागा शोधत असतात. मोर पक्षी मुख्यत: जमिनीवर विश्रांती करतात.
काही मोर हे झाडांवर तरी काही मोर हे झाडाच्या फांदीचा शाखावर झोपतात. मोरांना पावसाळी हवामान खूप आवडते. मोरांना कोणत्याही हवामानाच्या परिस्थितीत राहायला आवडते.
मोरांची प्रजाती
मोरांचे प्रमुख तीन प्रकार आणि प्रजाती आहेत. जसे कि भारतीय मोर, ग्रीन मोर आणि कांगो मोर इ.....