India Languages, asked by komal1781, 1 year ago

effects of global warming information in marathi​

Answers

Answered by siddharth3782cool
0

Answer:

eueheve8woehebdbdnkeoe9ed9

Answered by jwa
2

Answer:

पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे.

पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.

इतिहासातील तापमानवाढीच्या घटना

गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. १९०६ च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४X७ हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इ.स. १९५३ ते इ.स. २००३ या ५० वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. इ.स. १९७०च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे इ.स. १९७५-७६पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवषीर् २० सें.मी.चा थर टाकून देतंय. अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत.

सागरपृष्ठावरची तापमानवाढ या सागरी तुफानांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदार पाण्याच्या साठ्याचाही परिणाम या दोन तुफानांची तीव्रता वाढविण्यात झाला, असं लक्षात आले आहे. या शिवाय पावसाबरोबर सागरात शिरलेला कार्बन डायऑक्साईड वायू या तुफानांमुळे परत वातावरणात जातो. याचं कारण ही तुफानं सागर घुसळून काढतात, त्यावेळी हा कार्बन डायऑक्साईड पाण्याच्या झालेल्या फेसाबरोबर पृष्ठभागावर येतो आणि परत आकाशगामी बनतो. इ.स. १९८५ च्या फेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७०च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे.planation:

Similar questions