ek avishmarniya prasang essay in marathi
Answers
एक अविस्मरणीय प्रसंग
मी लहान होतो. ९ वर्षांचा असीन. बाबांनी नुकतीच सायकल घेऊन दिली होती आणि मी ती घेऊन शाळेत जायचो. पावसाळ्याचे दिवस होते. एक दिवशी मी शाळेतून घरी येत होत. मुसळधार पाऊस होता. रेनकोटचा आत पाणी घुसले होते आणि मी पूर्ण भिजून गेलो होतो. तेवढ्यात सायकलची चैन तुटली. मी सायकलवरून उतरलो. समोर वाटेत एक घर आलं. तिथे थांबायचा विचार आला.
त्या घरात घुसलो. एक आजोबा होते, त्यांनी घरात बोलावलं. मी आत गेलो. त्यांनी पाऊस थांबे पर्यंत आसरा दिला. मला खाऊ दिला. ३ तासांनी पाऊस थांबला. तीन संजांची वेळ झाली होती. मी आजोबांना धन्यवाद बोलून निघालो.
दुसऱ्या दिवशी आजोबांना भेटायचं असा ठरवलं. पाहतो तर काय घर गायब. तिथे ओसाड जागा होती. बाबांनी हि घटना सांगितली, तर ते म्हणाले की देव तुझा मदतीला आले होते. हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही.