ek raja pahata swapna marathi story
Answers
Answer:
कर्णधार बदलला आणि संघाचे नशिबही, पहिल्याच दिवशी भारतीय संघावर ओढवली मोठी नामुष्की...
कलिंग देशाचा राजा बलराम हा एक शूर राजा होता. त्याने अनेक लढाया जिंकल्या होत्या. एक दिवस राजवाड्यात त्याने एक महोत्सव आयोजित केला होता. देशोदेशीचे राजे, पाहुणे त्यासाठी आले होते. सकाळी होम हवनाचा विधी पार पडला. त्यानंतर पाहुण्यांनी समारंभपूर्वक राजा बलरामाचा नजराणे देऊन सत्कार केला. त्यानंतर सर्वांसाठी भोजनाचा बेत होता. पक्वान्नांसहित विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. रात्रीपर्यंत हा कार्यक्रम झाल्यावर राजाने सर्व अतिथींना निरोप दिला. दिवसभरच्या दगदगीने राजाला अंथरुणावर पडल्या पडल्या झोप आली. राजाच्या स्वप्नात एक साधू आला आणि म्हणाला, ‘राजा, तू महोत्सव तर चांगला साजरा केलास, मला तू बोलवले नाहीस. माझा राग नाही. परंतु तुझ्या ईशान्य सीमेवर जंगलानजिक सध्या चाललेली गडबड तुला ठाऊक दिसत नाही!...’ असं म्हणून साधू अदृश्य झाला. स्वप्न समाप्त झालं. राजाला या स्वप्नाचा अर्थ कळेना. म्हणून दुसऱ्या दिवशी काही सैनिकांबरोबर त्याने इशान्य दिशेला प्रस्थान केलं. राजा शंकराच्या देवळाजवळ राजा आला; परंतु त्याला पुढे काय करावं ते कळेना. पुढचा रस्ता जंगलातून होता. राजाने घोड्याचा वेग कमी केला. इतक्यात वाटेत एक आश्रम दिसला. राजा तिथे शिरला आणि काय आश्चर्य! त्याच्या स्वप्नात आलेला साधूच आतमध्ये बसलेला होता.
आत जाऊन त्याचे पाय धरत राजा म्हणाला, ‘क्षमा असावी, साधू महाराज, आपणास मी बोलवायला हवं होतं’ त्यावर साधू म्हणाला, ‘अरे ते महत्त्वाचं नाही. सांगायची गोष्ट अशी की, हा भाग सीमेवर येतो. रात्रीच्या वेळी इथे चोऱ्या-दरोडे यांच्या घटना वाढल्या आहेत. इथल्या लोकांना रात्री जीव मुठीत धरून रहावे लागते. काहीजण तर भीतीने घर सोडून निघून गेले. तुझं हेर खातं जर जागृत असतं तर ही वेळ आली नसती. म्हणूनच मी तुला सावध करीत आहे.’ त्याचं म्हणणं ऐकून राजा तिथून निघाला. त्याने आपलं हेरखातं कामाला लावलं. त्यावेळी त्याला लक्षात आलं की, खरोखरच सीमेपलीकडून येणाऱ्या चोरांचा उपद्रव वाढला होता. राजाने सीमेवरील सुरक्षारक्षकांची संख्या वाढविली आणि कामचुकार सैनिकांना शिक्षा केली. चोरांना मुद्देमालासह पकडण्यात आले. जनता सुखी झाली
Answer:
Explanation:
कर्णधार बदलला आणि संघाचे नशिबही, पहिल्याच दिवशी भारतीय संघावर ओढवली मोठी नामुष्की...
कलिंग देशाचा राजा बलराम हा एक शूर राजा होता. त्याने अनेक लढाया जिंकल्या होत्या. एक दिवस राजवाड्यात त्याने एक महोत्सव आयोजित केला होता. देशोदेशीचे राजे, पाहुणे त्यासाठी आले होते. सकाळी होम हवनाचा विधी पार पडला.
VIEW ANSWER IN-APP
THANKS
0