CBSE BOARD X, asked by nilofarshariff, 8 months ago

ek sainikh aani popat viknara Katha lekhan in Marathi

Answers

Answered by nishakankarwal51
0

Answer:

लोभी पोपट

एका घरात एक पोपट पाळलेला होता. त्याच्यासाठी एका सुंदर पिंजऱ्यात खाण्सायाठी ताजी-ताजी फळं, पाणी याची सोय केलेली असल्याने तो तिथं रमला होता. असे काही दिवस निघून गेले. कशाचीही कमतरता नसल्याने चिंतेचे काहीच कारण नव्हतं. पण एके दिवशी त्या घरासमोरील झाडावरच एक पोपटांचा थवा येऊन बसला.

एका घरात एक पोपट पाळलेला होता. त्याच्यासाठी एका सुंदर पिंजऱ्यात खाण्सायाठी ताजी-ताजी फळं, पाणी याची सोय केलेली असल्याने तो तिथं रमला होता. असे काही दिवस निघून गेले. कशाचीही कमतरता नसल्याने चिंतेचे काहीच कारण नव्हतं. पण एके दिवशी त्या घरासमोरील झाडावरच एक पोपटांचा थवा येऊन बसला. त्यांचा किलबिलाट, मुक्त संचार आणि आप्तांचा सहवास पाहून त्याला आता एकाकी वाटू लागलं. त्या पिंजऱ्यातील सुखसोयींचा उबग आला. आता यातून कधी बाहेर पडतो असं त्याला वाटू लागले. थोड्या वेळाने सारे पोपट जंगलाकडे उडत गेले. या कालावधीत एक पोपटाला मात्र पिंजऱ्यातील पोपटाजवळील विविध छान-छान फळे आणि पाणी पाहून आपल्यालाही असंच सुख मिळावं असं वाटू लागलं.

आता तो पोपट दररोज त्या झाडावर बसून पिंजऱ्याकडे पाहू लागला. एके दिवशी घरातील सारी मंडळी बाहेर गेली असताना पिंजऱ्यातील पोपटाने त्याला पिंजऱ्याजवळ बोलावलं आणि दररोज तिथं येण्याचं कारण विचारलं. तेव्हा तो म्हणाला, 'मला तुझ्यासारखं सुखदायी जीवन जगण्याची इच्छा आहे. ताजी फळे, रहायला सुरक्षित जागा. मला मिळेल का?', त्यावर पिंजऱ्यातील पोपट म्हणाला, 'हो मिळेल ना...पण ही जागा म्हणजे आपल्या स्वच्छंदी जीवनास पायबंद घालणारी असल्यामुळे काही क्षण तू हिचा अनुभव घेऊ शकतोस'. त्याने त्या पोपटाला चोचीने पिंजऱ्याच्या दरवाजाची कडी बाहेरुन योग्य दिशेला सरकवण्यास सांगितली.

दरवाजा उघडताच आतील पोपट बाहेर आला आणि बाहेरील आत गेला. तेथील वेगवेगळी फळं पाहून तो खुष झाला. त्याने दरवाजा ओढून घेत असताना बाहेर आलेल्या पोपटाने तो उघडाच ठेवण्यास सांगितलं. पण त्याने ते काही ऐकलं नाही. उलट म्हणाला, 'आता बाहेरची कडी सरकव. दरवाजा बंद असल्यावर एकट्याला या सुखाचा उपभोग घेता येईल'. ऐकत नाही पाहून पहिला पोपट त्याला सोडून जंगलात उडून गेला. घरची मंडळी परत आल्यानंतर त्यांनी पोपटाचे पंख वाढले. म्हणून छाटून टाकले. आपल्या मूर्ख अन् लोभीपणाचा दोष देऊन त्या सुखदायी वातावरणातही तो रडू लागला.

Similar questions