India Languages, asked by sonusande, 1 year ago

एक अविस्मरणीय सहल निबंध Marathi for class 7

Answers

Answered by halamadrid
34

■■ एक अविस्मरणीय सहल ■■

माझी सर्वात अविस्मरणीय सहल म्हणजे मी कॉलेजला तेरावीला असताना होती. तेव्हा आमच्या कॉलेजने महाबळेश्वरला सहलीचे आयोजन केले होते. ती तीन दिवसांची सहल होती.

माझे वडील मला सकाळी बसपर्यंत सोडायला आलेले. बसमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने आमचा प्रवास सुरू झाला.आम्ही प्रवासादरम्यान अंताक्षरी खेळत होतो. आमचे शिक्षकही आमच्यात सामील झाले.

बसमधल्या 'विंडो सीट' मधून सुंदर आकाश,उंच पर्वत,ते निसर्गमय वातावरण पाहण्याची मज्जाच निराळी होती.महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो व तिथे आराम केला.

दुसर्‍या दिवशी आम्ही मॅप्रो गार्डन, लिंगमाळा धबधबा, टेबल लैंड,सनसेट पॉइंट,वेना लेक,आर्थर सीट, एल्फिन्स्टन पॉइंट, प्रतापगड किल्ला या ठिकाणांना भेट दिली.महाबळेश्वर लोकल मार्केटमध्ये बरीच खरेदी केली. आमच्या परतीच्या प्रवासादरम्यान आम्ही वाई गणपती मंदिर, प्रति शिर्डीलाही भेट दिली.

ते तीन दिवस इतक्या लवकर कसे संपले,काय कळलेच नाही. त्या सहलीला अनेक वर्षे झाली पण त्या आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत.

Answered by ItsShree44
32

Answer:

आतापर्यंत शालेय जीवनातील अनेक सहलींना मी जाऊन आलो; पण लक्षात राहिली ती चौथीतील 'अर्नाळ्याची' सहल. चौथीत आम्ही सगळेच अजाण होतो. आई-बाबांपासून जास्त वेळ दूर राहण्याची सवय नव्हती. पण सहलीला जाण्याचा आनंद काही औरच असतो ! केवढे बेत केले होते आम्ही सर्व मित्रांनी!

एकदाचा सहलीचा दिवस उजाडला. भल्या पहाटेच आम्ही शिरा, पुरी, बटाट्याची भाजी, पाण्याची बाटली, बिस्किटे, गोळ्या, खेळायला पत्ते आणि इतर काही खेळांची साधने अशा सर्व सामग्रीनिशी शाळेच्या आवारात जमलो. सर्वांचे पालक हजर होते. त्यामुळे खूप गर्दी जमली होती. पण आम्हांला नेणाऱ्या बसचा बराच वेळ पत्ताच नव्हता. त्यामुळे सारेजण हिरमुसले होते. सहलीची सांगता येथेच होणार की काय, अशी भीती वाटत असतानाच बस आली. आई-बाबांचे निरोप घेता घेता बस केव्हा सुटली, ते कळलेही नाही. बसमध्ये आमचा आनंद ओसंडून वाहत होता. गाणी, गोष्टी, चेष्टामस्करी यांत आम्ही दंग होतो. रस्त्याच्या दुतर्फा केळ्यांच्या बागा दिसायला लागल्या, तेव्हा सहलीचे ठिकाण जवळ आल्याचे उमगले. गाडीत बाईंनी एवढा खाऊ दिला की, आम्ही आणलेला खाऊ खाण्याची वेळच आली नाही.

आम्ही अर्नाळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरलो. वाळूतून धावताना मजा वाटत होती. आजूबाजूला मच्छिमार बांधवांची घरे होती. बांबूंनी बांधलेल्या सांगाड्यांवर त्यांनी मासे वाळत टाकले होते. आम्ही उत्सुकतेने किल्ला पाहण्यासाठी गेलो. परंतु किल्ल्याचे भग्नावशेष तेवढे उरले होते.

खूप भटकून आल्यावर सगळ्यांनी आपापले डबे उघडले. सहभोजनामुळे जेवणाला वेगळीच लज्जत आली होती. दुपारी खेळांना मोठी रंगत चढली होती. एका देवळात आम्ही उतरलो होतो. मंदिरापुढे मोठे अंगण होते. लपाछपीचा डाव रंगात आलेला असतानाच बसच्याइंजिनात काहीतरी बिघाड झाल्याची बातमी आली. सर्वांचे चेहरे उतरले. आई काळजी करील, या विचाराने मीही घाबरून गेले.

काळोख पडला. आम्ही सर्वजण देवळात बसलो होतो. बसची दुरुस्ती चालू होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच परत जायचे, असे ठरले. पोटात कावळे ओरडू लागले. तेवढ्यात बरेचसे गावकरी देवळात आले. त्यांनी भरपूर भात व गरम पिठले आणले होते. पत्रावळीवर आम्ही तो गरम गरम भात व पिठले खाल्ले. गावातील एका व्यापाऱ्याने सतरंज्या, जाजमे, चादरी पाठवल्या. गावातील मुलांशी गप्पा मारता मारता आम्हांला केव्हा झोप लागली, हे कळलेच नाही.

सकाळी बाईंनी हाका मारल्यावर जाग आली. गावकऱ्यांनी दिलेला चहा, बटर घेऊन बसमध्ये बसलो. गावकऱ्यांच्या त्या प्रेमळ पाहुणचारामुळे आमची सहल संस्मरणीय ठरली.

Similar questions