India Languages, asked by somnathmore1829, 6 months ago

एका गरजू विद्यार्थी अन्य गरजू विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी विनंती करतो या आशयाचे पत्र लिहा​

Answers

Answered by shubhda86
4

गेली साठ वर्ष ग्रामीण विद्यार्थ्यांना पुण्यात अल्प दरात निवास, भोजन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी ही संस्था काम करीत आहे. संस्थेची पाच सुसज्ज वसतिगृह असून, सुमारे ४५० विद्यार्थी आणि ३०० विद्यार्थिनी येथे राहतात. उच्च शिक्षणातील विविध विद्याशाखांसाठी पुण्यात प्रवेश मिळाल्यावर समितीमध्ये प्रवेश मिळू शकेल. प्रवेश अर्जासोबतची कागदपत्रे तपासून मुलाखत घेतली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका योजने’त सहभाग नोंदवणे, व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदवणे अनिवार्य असते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर पडल्याचे येथील कार्यकर्त्यांचे व असंख्य माजी विद्यार्थ्यांचे निरीक्षण आहे. या संस्थेचे कामकाज समाजातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर सुरू असल्याने येथील नियमांची काटेकोर अमंलबजावणी होते.

Similar questions