India Languages, asked by soniya5119, 1 year ago

एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात अनेक प्राणी गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते.
परंतु त्या जंगलचा राजा हि दिसेल त्या प्राण्याला ठार मारीत असे व आपली भूक भागवत
असे. त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी सिंहाला अतिशय घाबरत असत,
एकदा सर्व प्राण्यांनी सभा भरवली व ठरवले की ........
Complete the story. ​

Answers

Answered by Hansika4871
39

....ह्या सिंहाला अद्दल घडवायची आणि दुसऱ्या प्राण्याला राजा बनवायचा निर्णय घेतात. दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी सिंहाला तक्रार करतात "राजे, अनर्थ झाला आहे, आम्ही पाणी पीत असताना आम्हाला तुमच्या पेक्षा मोठा सिंह दिसला, तो पाण्यात दडून बसला आहे" हे ऐकताच राजा भडकला आणि म्हणाला "असा आहे तर, मला आता त्याला बघायलाच पाहिजे".

असे म्हणत सगळे पाण्याजवळ येतात आणि सिंह पाण्यात डोकावून बघतो तेव्हा त्याला त्याचेच प्रतिबिंब मोठे दिसते. तो डरकाळी मारतो तेव्हा पण्यातुनही डरकाळीचा आवाज येतो, सिंहाला राग अनिवार होऊन तो पाण्यात उडी मारतो आणि बुडून त्याचा मृत्यू होतो.

तात्पर्य: मोठेपणाचा आव कितीही आणला तरी बुद्धी चातुर्या पुढे आपला मोठेपणा फोल ठरतो.

Similar questions