India Languages, asked by samratshinde02, 11 months ago

eka gulabache atmavrutta essay in Marathi​

Answers

Answered by halamadrid
8

■■"गुलाबाचे आत्मवृत्त"■■

नमस्कर मी "फुलांचा राजा", गुलाब बोलत आहे.माझा जन्म एका बागेत झाला.मी माझ्या भावा-बहिणींसोबत एकाच फांदीवर वाढलो.

मी माझ्या सुगंधाने वातावरणाला सुगंधित बनवायचो. पण,एक दिवशी एका मुलाने मला उपटले. त्याने माझा वास घेण्यास सुरुवात केली,माझ्या पाकळ्यांशी खेळू लागला.

काही वेळानंतर त्याने मला जमिनीवर फेकले आणि तो निघून गेला.मी रात्रभर तसाच जमिनीवर पडून राहिलो. अनेक लोकं माझ्या अंगावरुन, मला चिरडून जात होती.

दुसऱ्या दिवशी कचरा साफ करणाऱ्या कामगाराने मला उचलले आणि कचर्‍याचा डब्ब्यात टाकले.

आता मी कचर्‍याचा डब्ब्यात पडून हा विचार करतोय की माझे पुढचे राहण्याचे ठिकाण काय असेल.

चला आता निरोप घ्यायची वेळ आली,पुन्हा भेटु!

Similar questions