Hindi, asked by sharadm809, 5 hours ago

एक हुशार विद्यार्थी - सर्वांचा लाडका - परीक्षेत, खेळात हुशार - गर्वाची बाधा - खेळात वेळ घालवतो - - परीक्षा जवळ येते - अभ्यास कर - 'मला सर्व येते' - पेपर लिहिताना काहीच आठवत नाही - खूपच कमी गुण - पश्चात्ताप - गर्वाचे घर खाली.​

Answers

Answered by padmasheeesahoo851
1

Answer:

"खाली is a right answer

Answered by mad210216
1

कथा लेखन

Explanation:

  • गर्वाचे घर खाली.
  • राजेश नावाचा एक हुशार विद्यार्थी असतो. अभ्यासात हुशार असल्यासोबतच तो खेळांंमध्येही हुशार असतो. कोणत्याही परीक्षेत किंवा खेळांच्या स्पर्धांमध्ये राजेशला प्रथम क्रमांक मिळायचे. त्यामुळे तो शाळेत सगळ्यांचाच लाडका होता.
  • सगळ्यांकडून त्याची प्रशंसा व्हायची, ज्यामुळे हळूहळू तो स्वतःवर गर्व करू लागला. तो खेळ खेळण्यात जास्त वेळ घालवू लागला. खेळांच्या नादात तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागला.
  • जेव्हा त्याला शिक्षक अभ्यास करण्याचा सल्ला द्यायचे, तेव्हा तो त्यांना म्हणायचा,"तुम्ही चिंता करू नका, मला सर्व येते".
  • काही दिवसांतच परीक्षेची तारीख जवळ येते. अभ्यास न केल्यामुळे परीक्षेच्या दिवशी पेपर लिहताना राजेशला काहीच आठवत नाही. त्यामुळे, त्याला परीक्षेत खूप कमी गुण मिळतात.
  • तेव्हा, राजेशला पश्चाताप होतो. आपण जर गर्व केला नसता आणि वेळेवर अभ्यास केला असता तर आपल्यावर ही वेळ आल्या नसती, हे त्याच्या लक्षात येते.
  • तात्पर्य: गर्वामुळे माणसाचा विनाश होतो, म्हणून माणसाने कधीही गर्व करू नये.

Similar questions