*एक होती समई हा पाठ कोणत्या साहित्य प्रकारात मोडतो* 1️⃣ आत्मचरित्रात्मक 2️⃣ ललित 3️⃣ व्यक्तिचित्रणात्मक 4️⃣ यापैकी कोणताही प्रकार नाही
Answers
Answer:
आत्मचरित्रात्मक प्रकार आहे
Answer:
साहित्यप्रकार : साहित्यप्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण. लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते. वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची सुटी-सुटी वैशिष्ट्ये सांगणारे आणि यांपैकी प्रत्येक साहित्यप्रकाराची ऐतिहासिक उत्क्रांती कशी झाली, याची मांडणी करणारे अभ्यास महत्त्वाचे आहेतच परंतु साहित्यप्रकार म्हणजे काय ? या प्रश्नाची तात्त्विक वा सौंदर्यशास्त्रीय चर्चा केल्याशिवाय साहित्यप्रकारांच्या संकल्पनेला स्पष्टता लाभत नाही.
साहित्याचे वर्गीकरण : साहित्यप्रकारांचा तात्त्विक विचार म्हणजे वर्गीकरणाचा सिद्घांत [⟶झांर (Genre) थिअरी ] होय. वर्गीकरण म्हणजे काय ? ते का करायचे ? मानवी मनाच्या अनुभवप्रक्रियेत व ज्ञानप्रक्रियेत वर्गीकरणाचे स्थान काय ? कलेच्या निर्मितीमध्ये आणि कलानुभवामध्ये वर्गीकरणाचे स्थान काय ? हे प्रश्न मूलतः सौंदर्यशास्त्रामधील तात्त्विक वा सैद्घांतिक प्रश्न आहेत. या प्रश्नांविषयी काही मूलभूत भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत. संस्कृत काव्यशास्त्राच्या परंपरेमध्ये काव्यप्रकारांची चर्चा ⇨ दंडी, ⇨ भामह आणि ⇨ वामन या शास्त्रकारांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे भरताच्या ⇨ नाट्यशास्त्रा मध्येही दशरूपांची वा दशरूपकांची–म्हणजेच नाट्याच्या प्रकारांची–चर्चा आलेली आहे. परंतु या वर्गीकरणांविषयीचे सैद्घांतिक विवेचन या परंपरेमध्ये पुरेसे झालेले नाही. कारणे काहीही असोत परंतु रस आणि भाव, ध्वनी, रीती यांसारख्या संकल्पना जशा सैद्घांतिक पातळीवर चर्चिल्या गेल्या, तशी साहित्यप्रकारांची चर्चा संस्कृत काव्यशास्त्रात झालेली नाही. ⇨ॲरिस्टॉटलच्या (इ. स. पू. ३८४–३२२) पोएटिक्स (काव्यशास्त्र)या ग्रंथामध्ये वर उल्लेखिलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांविषयी तात्त्विक विवेचन आलेले आहे. कलाप्रकार व काव्यप्रकार/साहित्यप्रकार यांच्याविषयी ॲरिस्टॉटलने जे सिद्घांतन केले, त्याच्या आधारे पाश्चात्त्य समीक्षाव्यवहार पुढे अनेक शतके चालू होता.
साहित्याच्या (किंबहुना कलेच्या) सर्जनप्रक्रियेत आणि ग्रहणप्रक्रियेत मानवी मनाचा जो व्यापार घडत असतो त्याचे स्वरूप काय, याविषयीच्या भूमिकेवर कलेच्या वर्गीकरणाची शक्यता अवलंबून असते. पाश्चात्त्य साहित्यशास्त्राच्या परंपरेमध्ये या अभ्यासाचे चार टप्पे दाखविता येतात : पहिला टप्पा ॲरिस्टॉटलच्या मांडणीचा. या मांडणीच्या चौकटीमध्ये साहित्यप्रकारांचा अभ्यास अनेक शतके होत राहिला. या परंपरेला ⇨ अभिजाततावाद आणि नव-अभिजाततावाद यांचा टप्पा म्हणता येईल. दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमध्ये या परंपरेला छेद देणारी तत्त्वे ⇨ इमॅन्युएल कांट (१७२४–१८०४) याच्या सौंदर्यशास्त्रीय विचारामधून आणि ⇨ स्वच्छंदतावादी सिद्घांतामधून उद्भवली आणि साहित्यप्रकारांच्या अभ्यासाचे महत्त्व कमी झाले. तिसरा टप्पा रूपवादी सिद्घांताचा. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात रूपवादी विचारसरणीवर याच स्वायत्ततावादी सिद्घांताचा प्रभाव होता परंतु त्याचबरोबर साहित्यप्रकारांच्या रूपवैशिष्ट्यांचा वेध घेण्याचे प्रयत्नही या टप्प्यामध्ये सुरू झाले. शिवाय रूपनिष्ठ वैशिष्ट्यांबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक आशयतत्त्वांचा वेध घेणारी रशियन समीक्षक व भाषावैज्ञानिक मिखाइल बाख्तीन (१८९५–१९७५) याची साहित्यप्रकारांची चर्चाही याच टप्प्यात सुरू झाली. चौथा टप्पा १९५० नंतरच्या समीक्षेचा. या टप्प्यामध्ये विविध प्रकारच्या समीक्षाप्रवाहांमधून प्रकारनिष्ठ समीक्षेला व वर्गीकरणाच्या सिद्घांताला चालना मिळाली. ‘ शिकागो क्रिटिक्स ‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आर्. एस्. क्रेन, एल्डर ओल्सन प्रभृती अमेरिकन समीक्षकांनी क्रिटिक्स अँड क्रिटिसिझम : एन्शंट अँड मॉडर्न (१९५२) या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलप्रणीत तत्त्वांची पुनर्मांडणी करून साहित्यप्रकाराच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान दिले. नॉर्थ्रप फ्राय (१९१२–९१) या कॅनडियन समीक्षकानेही ॲनॅटोमी ऑफ क्रिटिसिझम (१९५७) या ग्रंथामध्ये साहित्यप्रकारांची एक गुंतागुंतीची, आधुनिक साहित्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करणारी व्यवस्था मांडली. १९७० नंतर संरचनावाद आणि चिन्हमीमांसा या भूमिकांच्या साहाय्याने जॉनाथन कलर, रॉबर्ट शोल्झ, त्स्वेतान तोदॉरॉव्ह इ. समीक्षकांनी साहित्यप्रकारांच्या चर्चेची नवी सैद्घांतिक मांडणी केली.
ॲरिस्टॉटलची प्रकारचौकट व नंतरची परिवर्तने : ॲरिस्टॉटलने कलेची व्याख्या करून सर्व कलांना समान असणाऱ्या सत्त्वाचा वेध घेतला. त्यासाठी त्याने ‘अनुकरण’ हे तत्त्व वापरले : सर्व कला या अनुकरणाचेच प्रकार असतात. कलांमध्ये ⇨ महाकाव्य, ⇨ शोकात्मिका, ⇨ सुखात्मिका, त्याचप्रमाणे वृंदगायनासाठी वापरले जाणारे भावनोत्कट (डिदिरँबिक) काव्य आणि बासरी व लायर या वाद्यांचे वादन यांचा उल्लेख त्याने केला आहे. अर्थात कलांची ही यादी परिपूर्ण नाही, तर उदाहरणादाखल आलेली आहे. चित्रकला, नृत्य इत्यादींचा उल्लेख पोएटिक्समधील या प्रारंभिक यादीमध्ये नसला, तरी ॲरिस्टॉटलच्या पुढच्या विवेचनामध्ये या कलांचे उल्लेख येतात. अनुकरणाचे तत्त्व हे मानवी ज्ञानाचा एक महत्त्वाचा स्रोत असतो, असेही ॲरिस्टॉटलने मानले. कलांचे प्रकार व उपप्रकार हे अनुकरणाच्या तीन पैलूंमधून निर्माण होतात : अनुकरणाचे माध्यम वा साधन (मीडियम वा मीन्स), अनुकरणाचे लक्ष्य (ऑब्जेक्ट) आणि अनुकरणाच्या