:..
एका जंगलात सांबरांचा एक कळप होता. लांब व सुंदर शिंगे असलेले एक सांबर त्यांच्यात
होते. ते स्वत:वरच खूश होते. स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असे.. एकदा सांबर एकटेच पाणी
प्यायला तळ्यावर गेले. पाणी पिता पिता पाण्यात त्याला आपले प्रतिबिंब दिसले.
स्वतःचे ते रूप पाहून सांबर फार खूश झाले. त्याची शिंगे उंच होती. ती वर्तुळाकार होत.
गेली होती. निमुळती होऊन ती टोकदार झाली होती. त्या शिंगांमुळे ते अधिकच सुंदर दिसत होते.
त्याच वेळी सांबराचे लक्ष आपल्या पायांकडे गेले. ते बारीक काटकुळे पाय पाहून ते दुःखी झाले.
इतक्यात त्याला शिकाऱ्याची चाहूल लागली. सांबर पळू लागले.........
Answers
Explanation:
एक सांबर एकदा तळ्याच्या काढावर उभे राहून पाण्यात पडलेले आपल्या प्रतिबिंबाकडे डोकावून पाहत होते. ते मनात म्हणाले, किती सुंदर आहेत माझी शिंगे दुसरया कुणालाच अशी शिंगं नाहीत. पण माझे पाय ? किती बारीक आणि काटकुळे आहेत.
इतक्यात त्याला पारध्याची चाहूल लागती. त्याने मागे वळून पाहिले तर त्याच्या दिशेने एक पारधी बाण मारण्यासाठी धावत येताना दिसला. सांबर जिवाच्या आकांताने धावू लागले व त्या पारध्यापासून खूप दूर गेले. वाटेत त्याला घनदाट जंगल लागले.
तो जंगलातून हळू हळू चालू लागला. इतक्यात त्याची शिंगे एका झाडात वाकलेल्या वेड्यावाकड्या फांद्यांमध्ये अडकली. त्याल तेथून पुढे जाता येत नव्हते. आता सांबराने आपली शिंगे सोडवण्याचा बराच प्रयत्न केला.
पर ती शिगे अजून अडकत गेली. त्याच्या मनात विचार आला अरेरे मी मघाशी माझ्या पायांबद्दल वाईट बोललो, पण त्यांनीच मला पारध्यापासून जीव वाचवण्यासाठी मदत केली.
या शिंगांच्या सौदर्याची मी स्तुती केली, तर तीच आता माझ्या मृत्यला कारणीमूत ठरत आहेत. इतक्यात पारधी तेथे आला व त्याने त्या सांबराला आयते पकडले व त्याला ठार केले.
शिकव ण : सौदर्यापेक्षा उपयुक्तता महत्ताची असते.