Math, asked by durveshBaji, 11 months ago

एक काम पूर्ण करण्यासाठी सुनीलला अनिलपेक्षा 5 दिवस जास्त लागतात, काम सुरू झाल्यानंतर 4 दिवसांनी अनिल ते काम सोडून निघून गेला. उरलेले काम सुनीलने 5 दिवसांत पूर्ण केले; तर प्रत्येकाला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?​

Answers

Answered by halamadrid
27

या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच,काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 10 दिवस लागतील, आणि सुनिलला 10+5=15 दिवस लागतील.

आपण असे मानूया की काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 'x' दिवस लागतात.

म्हणजेच एक दिवसात अनिल 1/x काम करणार.

प्रश्नानुसार,काम पूर्ण करण्यासाठी सुनीलला अनिलपेक्षा 5 दिवस जास्त लागतात.

म्हणजेच सुनीलला 'x+5' दिवस लागतात.

एक दिवसात सुनिल 1/x+5 काम करणार.

एक दिवसात अनिल आणि सुनिल दोघे मिळून काम करतील

= 1/x + 1/x+5

म्हणजेच,चार दिवसात अनिल आणि सुनिल दोघे मिळून काम करतील,

4(1/x + 1/x+5 )

एक दिवसात सुनील 1/x+5 काम करतो,

तर,पाच एक दिवसात सुनील 5(1/x+5) काम करणार,

काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसात अनिल आणि सुनिल दोघे मिळून काम करतात आणि उरलेले काम सुनील पाच दिवसात करतो,म्हणजेच

4(1/x + 1/x+5 )+5(1/x+5) =1

4/x +4/x+5 +5/x+5 =1

4/x + 9/x+5 =1

4(x+5) + 9x/x(x+5) =1

4x+20 + 9x/x2 +5x =1

4x+20 + 9x=x2 +5x

-x2 +13x-5x +20 = 0

-x2 +8x+20 =0

x2 -8x-20 = 0

x2 -10x+2x-20=0

x(x-10) + 2(x-10)=0

(x+2) (x-10)=0

x=-2 किंवा x=10

x ची किंमत नकारात्मक नाही होऊ शकत,म्हणून x=10

उत्तर:अनिलला 10 दिवस लागतील, आणि सुनिलला 10+5=15 दिवस लागतील.

Answered by pawansalunkhe9
3

Answer:

Pawan Salunkhe 491

307362

Similar questions