History, asked by venkateshgundale424, 4 months ago

एका क्रांतीकारकाचे मनोगत​

Answers

Answered by s7b1576simran2436
2

Answer:

शनिवार, १८ जानेवारी, २०२०

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

eka hutatma che manogat essay in marathi

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक : देशभक्ताचे आत्मवृत्त “माझ्या देशबांधवांनो! आज तुम्ही केवळ औपचारिकरीत्या 'हुतात्मा दिन' साजरा केलात, हे माझ्या पूर्णपणे लक्षात आले आहे. अकरा वाजता भोंगा वाजला आणि मिनिटभर तुम्ही आमचे स्मरण केलेत. काही जणांनी तेही केले नाही. कारण त्यांना हे भोंगे कशासाठी वाजले हेच मुळी उमगले नाही. माझ्या देशबांधवांनो,.

तुम्ही एवढे निष्ठुर का झालात? अरे, हया देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, आपल्या आत्म्यांची आहुती दिली त्यांची आठवणही तुम्ही विसरून गेला आहात, इतके कृतघ्न तुम्ही का झालात?

युग' म्हणावे लागेल, असे मला वाटते. आजचा माणूस विचार करतो तो फक्त स्वतःचा, फक्त 'मी'चा. आमच्या युगात हा 'मी' अस्तित्वातही नव्हता. सारेजण भारावले होते ते एकाच विचाराने आणि तो विचार म्हणजे 'देशाचे स्वराज्य' मिळविणे, गुलामगिरीचे पाश तोडणे. 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार'अशी सर्वांची मनःस्थिती होती.

स्वातंत्र्यसंघर्षाचा मार्ग हा अतिशय अवघड होता याची आम्हां सर्व देशभक्तांना कल्पना होती. हे 'सतीचे वाण' कोणी आमच्यावर लादले नव्हते, तर ते आम्ही स्वतःहूनच स्वीकारले होते. त्यावेळी पुढे वाढून ठेवलेल्या सर्व दुःखांची, संकटांची आम्हाला पूर्ण कल्पना होती. तरी पण आम्ही या मार्गाने निघालो. कारण- 'आम्हा बांधू न शकले, कीर्तीचे वा प्रीतीचे धागे.

Similar questions