Science, asked by shravanibhosale075, 5 hours ago

एक लीटर पाण्याचे वस्तूमान १किलोग्रॅम एवढे आहे तर पाण्याची घनता किती ?​

Answers

Answered by tambebushra0710
2

Answer:

Explanation:

Density = Mass / Volume. Or in layman's terms, the mass of 1 cm^3 or 1 m^3 of an object. Substituting both into the density equation, we get the density of water to be 1g/cm^3

Answered by khyatishreemahto
10

Answer:

हा काय प्रश्न झाला, असं कोणीही म्हणेल. आजकालचा कोणताही शाळकरी विद्यार्थी याचं ताडकन उत्तर देईल. पाण्याची घनता १ आहे; पण तिथंच त्याची पहिली चूक होईल. कारण घनतेला एकक आहे. तेही सांगायला हवं. घनता १ आहे खरी, पण १ काय? १ रुपया ?१ किलोमीटर? १ सेकंद? तर तुम्ही म्हणाल, की ठीक आहे. सांगतो एकक. पाण्याची घनता १ ग्रॅम प्रती मिलिलिटर आहे किंवा १ किलोग्रॅम प्रती लिटर. आता तरी झालं समाधान? नाही, तरीही समाधान होणार नाही. कारण पाण्याची घनता अनेक घटकांवर अवलंबून असते. पाण्याचे तापमान हा एक पटक. कारण तापमानानुसार पाण्याचे आकारमान बदलत जातं. जसं तापमान वाढेल तसं पाणी प्रसरण पावतं. म्हणजेच त्याचं आकारमान वाढत जाते: पण वजनात फरक पडत नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं तर, ज्या पाण्याचे वजन १ ग्म होते त्या्च आकारमान आता एक मिलिलिटर राहत नाही, ते त्याहून जास्त होतं. म्हणजेच मग पाण्याची घनता कमी होते. ज्या वेळी पाण्याचे पूर्णपणे वाफेत रूपांतर होतं त्या वेळी तर त्याचं आकारमान कितीतरी पटीनं बाढल्यामुळे अनता तेबळ्या पटीनं कमी होते.

उलट बाजूता जेव्हा पाण्याचं तापमान कमी होत जाते तेव्हा पाणी आकसतं. म्हणजेच त्याच आकारमान कमी होत जातं. त्यामुळे त्याची बनता वाढत जाते. ही परिस्थिती पाण्याचे तापमान चार अंश सेल्सियस होईपर्यंत राहते. त्या तापमानाला पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. या वेळी एक विचित्र घटना घडते. त्या वेळी पाण्याचं एकदम प्रसरण होता, त्याचे आकारमान वाढतं. अशी परिस्थिती केवळ पाण्याच्या बाबतीतच होते. यालाच 'अनामतस एक्स्पान्शन ऑफ वाॅटर' असं म्हणतात. पाण्याचं विचित्र प्रसरण, त्यामुळे तापमान त्यापेक्षा कमी झालं की परत त्याची घनता कमी होते. म्हणूनच तर बर्फाचा खडा पाण्याबर तरंगतो. तेव्हा पाण्याची घनता चार अंश तापमानाला सर्वात जास्त असते.

हवेचा दाब आणि आकारमान यांचा परस्परसंबंध असल्यामुळे हवेच्या दाबाचाही पाण्याच्या घनतेवर परिणाम होतो. पण पाणी कितपत शुद्ध आहे, यावरही त्याची घनता अवलंबून असते. जर पाण्यात क्षाराचे प्रमाण बाढल किंवा कमी झालं तरी मग एक मिलिलिटर पाण्याचं वजन त्यानुसार बदलतं. समुद्राच्या खाऱ्या पाण्याची घनता गोड्या पाण्याइतकी असत नाही. म्हणजेच क्षाराच्या प्रमाणानुसार पाण्याच्या घनतेतही तसा फरक पडतो. तेव्हा पाण्याची घनता एक ग्रॅम प्रती लिटर असते, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या वेळच्या परिस्थितीचीही माहिती द्यावयास हवी. म्हणूनच अचूक बोलायचं तर, जेव्हा तापमान आणि दाब सर्वसामान्य असतात तेव्हाच, म्हणजे जेव्हा तापमान २७-२८ अंश सेल्सियसच्या आसपास असतं आणि समुद्रसपाटीप्रमाणे हवेचा दाब पान्याच्या ७६० मिलिमीटरच्या स्तंभाइतका असतो, तेव्हाच पाण्याची जनता एक किलोग्रॅम प्रती लिटर एवढी असते

Similar questions