Science, asked by Maiha1437, 1 day ago

एक लिटर उकळते पाणी आणि पाण्याने भरलेला तलाव यांत अधिक उष्णता संचय कोठे असतो ? तुमच्या उत्तराचे स्पष्टीकरण दया.​

Answers

Answered by sohamsarkarric
0

Explanation:

उष्णतेची जाणीव स्पर्शाने होऊ शकते; उष्णतेमुळे पदार्थात होणाऱ्या रंगातील व आकारातील फेरबदलामुळे तिच्या तीव्रतेचा अंदाज करता येतो.

पाण्यास हळूहळू उष्णता दिली म्हणजे त्याचा कढतपणा वाढत जातो किंवा त्यातून उष्णता काढीत गेल्यास त्याचा थंडपणा वाढत जातो, हा अगदी नेहेमीचा अनुभव आहे. कढतपणाचा किंवा थंडपणाचा अंदाज स्थूलमानाने स्पर्शाने ठरवता येतो, हा अंदाज म्हणजे पाण्याच्या निरनिराळ्या वेळी असणाऱ्या औष्णिक स्थितींतील फरक होय. कढतपणाची किंवा थंडपणाची कल्पना अगदी मूलभूत आहे; किंबहुना कढतपणाची किंवा थंडपणाची स्थिती म्हणजेच तापमान अशी व्याख्या करतात. तापलेला पदार्थ थंड पदार्थावर ठेवला असता काही वेळाने दोन्हीही पदार्थांचे तापमान सारखेच होते, पण पाहिल्या पदार्थाच्या तापमानापेक्षा कमी झालेले आढळते; यावरून उष्णता, तापलेल्या पदार्थातून म्हणजे उच्च तापमानातून, थंड असलेल्या पदार्थाकडे म्हणजे नीच तापमानाकडे वाहते असा निष्कर्ष निघतो. यावरून तापमान हे उष्णता वहनाचे गमक आहे असे म्हणता येईल.

दोन पदार्थ एकमेकांस चिकटवून ठेवल्यास त्यांची औष्णिक स्थिती (तापमान) कालांतराने एकसारखी होते; म्हणजेच त्यांचे तापमान एकसारखे होते. तसेच एकाच औष्णिक स्थितीतील दोन पदार्थ तिसऱ्या पदार्थाच्या सान्निध्यात ठेवल्यावर त्या सर्वांची औष्णिक स्थिती एकसारखी असल्याचे आढळून आल्यास तिन्ही पदार्थांचे तापमान एकच आहे, असे ठरवता येते. या गृहीतावर व प्रायोगिक आधारावर तापमापकाची उभारणी झाली आहे.

सारख्याच तापमानाचे पदार्थ सारखीच उष्णता धारण करतील असे मात्र नाही. उदा., कढत पाण्याच्या भांड्यातून थोडे चमचाभर पाणी काढल्यास, भांड्यातील व चमच्यातील पाण्याचे तापमान सुरुवातीस सारखेच असले, तरी भांड्यातील पाण्याच्या उष्णतेचा साठा चमच्यातील पाण्याच्या उष्णतेच्या साठ्यापेक्षा केव्हाही निःसंशय जास्त आहे. पदार्थातील उष्णता संचय त्याच्या वस्तुमानावर, विशिष्ट उष्णतेवर (वि. उ. वर) तसेच तापमानावर अवलंबून असतो, हे प्रस्तुत नोंदीत पुढे योग्य ठिकाणी दाखविले आहे.

Similar questions