एक पेशीय सजीव कसे निर्माण झाले
Answers
Answer:
जेव्हा एखादा जीव एक पेशी पासून बनलेला असतो तेव्हा त्याला एकपेशीय सजीव असे म्हणले जाते . जेव्हा पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती झाली होती तेव्हा सर्वप्रथम एक पेशीय सजीवच निर्माण झाले होते . या एक पेशीय सजीवांपासूनच इतर प्राण्यांची निर्मिती झाली. उदाहरणार्थ अमिबा
Answer:
सजीवांच्या निर्मितीसाठी पाणी हा घटक खूप आवश्यक असतो.
खूप वर्षांपूर्वी ज्यावेळेस पृथ्वी ही अतिशय गरम अशा स्वरूपात होती. मात्र काही भौगोलिक कारणांमुळे हळूहळू त्याच्यात बदल झाले व पृथ्वी थंड होऊ लागली. कालांतराने पृथ्वीवर ती भौगोलिक परिस्थितीमुळे पाण्याची निर्मिती झाली आणि पाण्यामुळेच काही एक पेशीय सजीवांची निर्मिती झाली.
ज्या सजीवांच्या शरीररचनेत फक्त एक पेशी असतात अशा सजीवांना एक पेशीय सजीव असे म्हणतात.
एक पेशीय सजीव हे निव्वळ डोळ्याने बघणे कठीण असते ते अतिशय सूक्ष्म स्वरूपाचे असतात. कुठलाही एक पेशीय सजीव बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज भासते.