एक राजा -प्रजाहित दक्ष म्हणून दूरवर कीर्ती - राजमहालाबाहेर मोठी घंटा-राज्यात दवंडी-"कोणासही न्याय हवा असेल तर दोर ओढून घंटा वाजवावी"-एके दिवशी चरत चरत एक गाढव राजमहालाबाहेर-गवत चरताना दोर ओढून घंटेचा आवाज-राजा महालाबाहेर - "गाढवाच्या मालकाला बोलवा" राजाची आज्ञा
Answers
nice story can you tell next part please
Answer:
एका गाढवाची गोष्ट
एकदा अनंतपुरी नावाचं एक राज्य होतं. त्या राज्यातला राजा खूप महान होता. सूर्यसेन असे त्या राजाचे नाव होते. अतिशय प्रामाणिक, प्रजाहितदक्ष म्हणून दूरवर राजाची कीर्ती पसरलेली होती. राजा नेहमी लोकांच्या हिताचा विचार करीत असे. कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या व्यक्तींना न्याय देण्याचे काम करत असे. राजामुळे त्या राज्यात सुख समाधान नांदत होते आणि राज्यातली प्रजा देखील खूप खुश होती.
एकदा राजाने ठरवले की राजमहाला बाहेर मोठी घंटा लावण्यात यावी. ही घंटा ज्या व्यक्तींवर अन्याय होत असेल त्या व्यक्तींसाठी लावण्यात आली होती. राजाने पूर्ण राज्यात दवंडी देण्यास सांगितले. जर कुणावर अन्याय होत असेल तर त्या व्यक्तीने राजमहालाबाहेर लावलेली घंटा वाजवावी.
त्या गावात एक धोबी राहत होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. तो रोज त्या गाढवाच्या पाठीवर ओझे ठेवून माल विकण्यासाठी त्याला बाजारात नेत असे. त्याच्याकडून खूप काम करून घेत असे. दिवसभर गाढवा कडून धोबी काम करून घेई व रात्री त्याला चरण्यासाठी मोकळे सोडत असे.
एकदा गाढव चरत चरत राजाच्या दरवाजा बाहेर येऊन पोहोचले. गाढवाने घंटेचा दोर ओढला. व त्याचा जोरात आवाज झाला. तो आवाज राजाच्या कानावर पडला. व राजा लगेच राजमहालाच्या बाहेर आला. राजाने विचार केला गाढवाने दोर आेढला. राजाने गाढवाला राजमहालात घेऊन येण्यासाठी सेवकाला आदेश दिला. गाढवाने त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाची सर्व हकीकत राजाला सांगितली.
गाढवाने सांगितले मी दिवस-रात्र मेहनत करतो, तरी सुद्धा माझा मालक माझ्यावर दया दाखवत नाही. मला काठीने मारत असतो, नेहमी उपाशी ठेवतो. असे गाढवाने राजापाशी सांगितले. राजाने गाढवाच्या मालकाला दरबारात आणण्याची सेवकाला आज्ञा दिली. गाढवाच्या मालकाला सर्व हकीकत विचारण्यात आली. तेव्हा राजाला गाढवावर होत असलेल्या अन्यायाची फार चीड आली. राजाचा संताप अनावर झाला. व राजाने गाढवाच्या मालकाला शिक्षा देण्याचे ठरवले. मालकाला बंदिस्त करण्यात आले. व गाढवाला राजाने राजदरबारातच राहण्याची सोय केली. हे ऐकून गाढवाला खूप आनंद झाला.