eka rudache manogat niband in Marathi
Answers
Answer:
write the question clearly
नमस्कार मित्रा,
# एका वृक्षाचे मनोगत-
मी एक झाड बोलतोय. मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. माझ्यामुळेच तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो. मी जर ऑक्सिजन निर्माण नाही केला तर तुम्ही श्वास कसा घ्याल, निसर्गाचा ऱ्हास करून बनवलेल्या घरात कसे राहाल? जंगले तोडून बांधलेल्या रस्त्यांवर प्रवास कसा कराल? जर झाडे नसतील तर या पृथ्वीवरचे जीवनाचं नष्ट होईल.
माझ्या अंगाखांद्यावर पशू पक्षी खेळतात. किती पक्षी तर आपली घरटी माझ्या फांद्यांवर मांडतात. तुम्ही त्यांचे घर तोडून टाकता आणि आपले घर बांधता आणि मग एखादा बिबट्या, हत्ती घरात, शेतात शिरला तर, आरडाओरड करता? त्याला तुम्ही पळवून पळवून मारून टाकता.
ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे, पुढच्या पिढीला हे अनुभव कधीच अनुभवता येणार नाहीत आणि मग तुम्ही तक्रार करता कि आमची मुले दिवस रात्र विडिओ गेम्स खेळत बसतात. तुमच्या सारखे आम्ही सुद्धा जिवंत आहोत, आम्हाला ही भावना आहेत, आम्हाला ही वेदना होतात.
तुम्ही जंगलात वणवे लावता, हजारो छोटे मोठे प्राणी, पक्षी मारले जातात, त्यांना स्थलांतर करावे लागते. या सर्वामुळे नकळत तुम्ही मानवी जीवन चक्र प्रभावित करत आहात. तुम्ही स्वतःच्या हातांनी आपला विनाश लिहत आहात.
माझे हे मनोगत ऐका आणि प्रत्येकानी एक नाही चार चार झाडे लावा. मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर झाडे लावा. फक्त आपल्या जमिनीवरील नाही तर दुसऱ्याच्या झाडांनाही पाणी घाला.
निसर्ग खूप बलाढ्य आहे, तो खूप सहनशील आहे, पण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका, हीच विनंती. सर्वात शेवटी मी एकच मंत्र देईल, “झाडे लावा झाडे जगवा"
धन्यवाद.