एक संस्मरणीय सामना मराठी निबंध
Answers
Explanation:
१९८३ मध्ये भारताने कपिलदेवच्या नेतॄत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर १९८५ साली सुनिल गावस्करच्या नेतॄत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये झालेली मिनी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा तेव्हा "बेन्सन अॅन्ड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप" म्हणून ओळखली गेली होती. हीच ती स्पर्धा ज्यात रवी शास्त्री "चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स" ठरला आणि त्याच्या पदरात ऑडी पडली.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे भारताने खेळलेला प्रत्येक सामना जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारताने फक्त २ झेल सोडले. कोणते ते या लेखात येतीलच ओघाने. स्पर्धेमध्ये भारताचे क्षेत्ररक्षण अगदी दॄष्ट लागण्याजोगे होते. स्पर्धेची सुरुवात भारत-पाकिस्तान सामन्याने झाली. याच स्पर्धेतला माझ्या दॄष्टीने झालेला अविस्मरणीय सामना म्हणजे उपांत्य फेरीतला भारत-न्यूझीलंड सामना. भारताने आधीचे सगळे सामने जिंकून उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला होता. भारताची उपांत्य फेरीपर्यंतची वाटचाल अशी झाली होती -
१) भारत - पाकिस्तान मेलबर्न २०-फेब्रुवारी-१९८५
भारत ६ विकेट्सनी विजयी
२) भारत - ईंग्लंड सिडनी २६-फेब्रुवारी-१९८५
भारत ८६ धावांनी विजयी
३) भारत - ऑस्ट्रेलिया मेलबर्न ०३-मार्च-१९८५
भारत ८ विकेट्सनी विजयी
भारताची उपांत्य फेरीत गाठ पडणार होती न्यूझीलंडशी, ५ मार्च १९८५ रोजी सिडनी येथे. क्षेत्ररक्षण,गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही आघाड्यांवर न्यूझीलंड आपल्यापेक्षा सरसच होते. एक नजर न्यूझीलंडच्या संघावर टाकून बघा म्हणजे क्ळेल.