Hindi, asked by aaryabhagat555, 9 months ago

एक शहर -अनेक मंदिरे- दोन भिकारी- एक आंधळा-एकाला एक हात नाही -भिक्षा मिळत राहणे- पण उपास मार-विचार करणे - दुसरे मंदिर शोधणे- भरपूर भीक मिळणे- नवा विचार - त्यावर काम - तात्पर्य
कथा लिहा​

Answers

Answered by PrathameshGolekar
11

Answer:

एक राजा आणि शेठजी यांची गाढ मैत्री होती. शेठजी चंदनाच्या लाकडांचा व्यापारी होता. ४-५ वर्षे त्याच्या लाकडाची विक्री झालीच नाही. त्याला असे वाटले की, हे लाकूड मूल्यवान आहे. हे लाकूड कोण विकत घेईल ? हे केवळ राजाच विकत घेऊ शकतो. शेठजीला असे वाटले की, राजा जर मेला, तर त्याला जाळण्याकरता चंदनाच्या लाकडांची आवश्यकता लागेल. त्यामुळे माझा व्यापार चांगला होईल.

इकडे राजाच्या मनात शेठजींच्या विषयी कुभाव उत्पन्न झाला की, हा शेठजी निपुत्रिक आहे. जर हा मेला, तर याचे धन राज्य भांडारात जमा होईल. दोघांच्याही मनात असे कुविचार येऊन गेले. जेव्हा ते भेटले, तेव्हा त्यांनी एकमेकांना आपापल्या मनातील विचार सांगितले.

राजाच्या मनात असे विचार यायचे कारण काय, तर शेठजींच्या मनात त्या राजाविषयी वाईट विचार आला; म्हणून राजाच्या मनात त्याची प्रतिक्रिया उमटली. राजाने शेठजींची कान उघडणी केली की, वाईट विचारांपेक्षा मनात चांगले विचार आणावे, उदा. राजाने आपल्या महालाचे दरवाजे चंदनाचे करावे आणि माझे सर्व चंदन विकले जावे.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Answered by mad210216
15

कथा

Explanation:

"पैशांचा सदुपयोग"

  • जयदपुर नावाचे एक शहर होते. तिथे अनेक मंदिरं होती. मंदिराबाहेर भिकारी भिक मागण्यासाठी बसायची.
  • त्यात दोन भिकारी चांगले मित्र होते. एक आंधळा होता तर एकाला एक हात नव्हता. त्यांना लोकांकडून भिक्षा मिळायची, परंतु ते पैसे पुरेसे नसल्यामुळे, त्यांची उपासमार व्हायची.
  • मग एक दिवशी त्यांनी दुसऱ्या मंदिराच्या बाहेर भिक्षा मागायचे ठरवले. तिथे त्यांना लोकांकडून भरपूर भिक मिळायला लागली. ते खूप आनंदी झाले. त्या पैशांनी रोज त्यांना दोन वेळचे जेवण मिळू लागले.
  • आपल्याला मिळणाऱ्या भिक्षेचे योग्य उपयोग झाले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी आपल्याला मिळालेल्या पैशांनी एका अंध व दिव्यांग लोकांना शिकवणाऱ्या शाळेत प्रवेश घेतले.  
  • हळूहळू ते शिकू लागले व काही दिवसांनी त्यांना एका संस्थेत चांगले काम मिळाले. त्यानंतर, त्यांनी भीक मागणे सोडून दिले.  
  • तात्पर्य: माणसाने पैशांचा नेहमी योग्य उपयोग केला पाहिजे.

Similar questions