Eka stree chi atmakatha essay in marathi
Answers
Answer:
Hieee…
मी बोलतेय…
मी एक मुलगी आहे…
समाजातील दुसरी जात…
शरीर रचना , बांधणी वेगळी आहे…
पण क्षमता, बौद्धिक पातळी, संवेदना आणि या सगळ्यांचा जिवंतपणा, हा दोन हात, दोन पाय…. इत्यादी वर मापू नये अशीच गय घालत आली आहे मी आईच्या गर्भाशयातून ते म्हातारपणा पर्यंत…
माझा विकास झाला का?…
तर हो परकर- पोलखे पासून ते जीन्स पर्यंत…
कपड्यापासून ते सॅनिटरी नॅपकिन पर्यंत…
अरेंज पासून ते लव्ह मॅरेज पर्यंत…
कुंकपासून टिकलीपर्यंत…
आरोग्यदायी पासून slimtrem पर्यंत…
फक्त…
धर्म तेवढा चिटकून आहे…
बुरख्यात, बांगड्यात, मंगळसूत्रात, मंदिरात, दर्ग्यात, चर्चमध्ये, गुरुद्वारेत, स्मशानातही…
काल जागतिक महिला दिन…
काही अप्रतिम गोष्टी घडल्या
उदरणार्थ…
1. पुन्हा एकदा आरक्षण मागणीसाठी नुसतेच टेम्भलणे…
2. ICICI बँकेने आजारपणात आणि बाळंतपणाच्या काळात Work From Home ची महिलांसाठी नोकरी सोडू नये म्हणून सुविधा…
3. तृप्ती देसाईचा मंदिर प्रवेशाबाबत पुन्हा बंड…
4. 3 महिला FIGHTER PILOT 8 जून 2017 पासून कार्यभार सांभाळणार…
5. वृद्ध आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी विवाहित मुलीची सुद्धा असा नागपूर खंडपीठाचा निर्णय…
6. जहान आरा यांची काझी म्हणून निवड व नियुक्ती…
7. गुगल डुगल च्या महिलांना ध्वनीचत्रफितीतून शुभेच्छा…
8. नीरज्यांच्या जबाबदारी वर विमानाचे उड्डाण…
म्हणून काल आम्ही स्त्री जातीवाल्या बहुतेक सर्वच खूष होतो…
जाणीवपूर्वक कोणतीही post करू नये म्हणून काल शांत…. अन इतर करत बसले होते, माझ्या मौनाची भाषांतरे… नाही म्हटलं तरी अनेक पुरुषांनी आपल्या पुरुषी अहंभावाच्या स्वरातच स्त्रियांना शुभेच्छा दिल्या. काहींनी मात्र दररोज post टाकणाऱ्यांना काल जरा कंटाळाच आला होता, तरी उपकार म्हणून मोठ्या रुबाबात post टाकल्या. तर काही पुरुषांनी खरच अभिमानाने post टाकल्या. शुभेच्छा मनातून येत नसतील तर देऊच नये. कारण एखाद्या मुलीचे, ताईचे, बाईचे, बायकोचे, विधवेचे, म्हातारीचे स्त्रीत्व हे पुरुषांच्या शुभेच्छांवर निश्चितच अवलंबून नाही. असोत काल सोहळा होता खर तर, पण काहींनी त्याला महिलांचा पोळा समजले ! तरी सुद्धा माफ करण्याचा मोठेपणा आणि सहनशक्ती स्त्रियांना निसर्गाने तुलनात्मक दृष्टीने जास्तच दिली आहे….
* फक्त खंत आहे की…
स्त्री- पुरुष समानतेच्या वाटेने आम्ही जरा खूपच धावपळीत जात आहोत…
उदरणार्थ…
1. लिंग गुणोत्तर – 1000 पुरुषांमागे 943 महिला…
2. दर 29 मिनिटांनी 1 गँग रेप…
3. दर 9 मिनिटांनी एक घरगुती हिंसाचार…
4. 34% ऍसिड हमले मुलींचा लग्नासाठी नकार म्हणून, 20% संपत्ती, जमीनीमुळे,
5. अद्यापही नवऱ्याने बायकोची इच्छा व परवानगी नसताना केलेला संभोग (जबरदस्ती ) गुन्हा मानल्या जात नाही…
6. 24% पुरुष नवरे मानतात, की ते महिलांना संभोगासाठी जबरदस्ती करतात…
7. दर 77 मिनिटांनी एक महिला जाते हुंडाबळी…
8. प्रत्येक 3 मिनिटानंतर महिलांवर कोणतातरी हिंसाचार, अन्याय होतो…
9. 65% पुरुष मात्र महिलांनी हे सगळे संसारासाठी सहन करावे असे मत आहे…
तरी आम्ही महिला जाम खूष आहोत. महिला दिनी आम्हाला किती फुलं मिळाली याच तंद्रीत…
असोत…
चांगल्याचे कौतुक व्हावे पण वास्तविकतेचं काय???…
आजही तेच… तिथेच…
स्वातंत्र, न्याय, समता, समानता, इत्यादी -इत्यादी…
काळजी घ्या पोरींनो…
कारण तुम्ही वेगळ्या आहात…
वेगळेपणावर जसे प्रेम तसा तिरस्कार
आणि ईर्षाही असतेच…
( महिलांना प्रामाणिकपणे त्यांच्या प्रगतीकरिता मदत करणाऱ्या आणि सन्मान देणाऱ्या सर्व पुरुषांचे मनापासून आभार…
आणि महिलांच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या महिलांनी त्यांच्या कृत्याचा विचार करावा ही नम्र विनंती… )
– स्नेहा मगर…
Explanation:
plz follow me and mark me as brainlist plzzz