एका टेबलावर सात पुस्तके एकावर एक ठेवली आहेत. हिंदी व इंग्रजी या पुस्तकांच्या मध्ये मराठी पुस्तक आहे, तर भूगोल व मराठी या पुस्तकांच्यामध्ये गणित व हिंदी ही दोन पुस्तके आहेत, इंग्रजी व विज्ञान या पुस्तकांच्यामध्ये भूमिती हे पुस्तक आहे तर मध्यभागी कोणते पुस्तक आहे ? A) हिंदी B) मराठी C) इंग्रजी D) गणित
Answers
Answer:
पर्याय : B) मराठी
Explanation:
टेबलावर एकूण असलेली पुस्तके = 7
दिलेल्या प्रश्नामधील,
★ पहिल्या अटीनुसार :
हिंदी व इंग्रजी या पुस्तकांच्या मध्ये मराठी पुस्तक आहे -
हिंदी, मराठी, इंग्रजी
★ दुसऱ्या अटीनुसार :
भूगोल व मराठी या पुस्तकांच्यामध्ये गणित व हिंदी ही दोन पुस्तके आहेत -
भूगोल, गणित, हिंदी,मराठी
म्हणजेच, पुस्तकांची मांडणी -
भूगोल, गणित, हिंदी,मराठी,इंग्रजी
★ तिसऱ्या अटीनुसार :
इंग्रजी व विज्ञान या पुस्तकांच्यामध्ये भूमिती हे पुस्तक आहे -
इंग्रजी, भूमिती, विज्ञान
म्हणजेच, पुस्तकांची मांडणी -
भूगोल, गणित, हिंदी, मराठी, इंग्रजी, भूमिती, विज्ञान अशी राहील .
सात पुस्तके टेबलावर एकावर एक ठेवली आहेत त्यांची रचना अशी असेल -
1). भूगोल
2). गणित
3). हिंदी
4). मराठी
5). इंग्रजी
6). भूमिती
7). विज्ञान
वरीलप्रमाणे पुस्तके एकावर एक ठेवली असता, मराठी पुस्तक मध्यभागी असेल.
∴ पर्याय : B) मराठी
मध्यभागी मराठी पुस्तक आहे.
➠ उत्तर -
➻ प्रस्तुत प्रश्न तार्किक तर्क प्रश्न अर्थात
( Logical reasoning question )आहे .
➻ या प्रश्नाला समजून घेण्याकरिता आपल्या त्याचा अर्थ समजून घेणे सर्वात गरजेचे आहे
➻चला तर जाणून घेऊ या प्रस्तुत प्रश्नाचा अर्थ
➥ प्रस्तुत प्रश्नाचा अर्थ -
- एका टेबलावर सात पुस्तके विशिष्ट क्रमा अनुसार ठेवल्या गेलेली आहे .
- पहिल्या अटी अनुसार हिंदी व इंग्रजी या पुस्तकांच्या मध्ये मराठी पुस्तक आहे .
- दुसऱ्या अटी अनुसार भूगोल व मराठी या पुस्तकांच्यामध्ये गणित व हिंदी ही दोन हे पुस्तक ठेवलेले आहे
- तिसऱ्या अटी अनुसार इंग्रजी व विज्ञान या पुस्तकांच्यामध्ये भूमिती हे पुस्तक
- आपल्याला मध्यभागी कोणते पुस्तक ठेवलेले आहे की शोधून काढायचे आहे. (मध्यभागी म्हणजे केंद्रात , मधात )
➥ आपल्याला या प्रश्नात काय शोधायचे आहे ?
➻ या विशिष्ट क्रमामध्ये ठेवलेल्या पुस्तकात कोणते पुस्तक मधल्या भागात स्थित आहे ही गोष्ट आपल्याला शोधून काढायची आहे .
➥ स्पष्टीकरण :
➻पहिल्या अटी अनुसार हिंदी व इंग्रजी या पुस्तकांच्या मध्ये मराठी पुस्तक आहे
➻ तर, आपल्याकडे क्रमाने क्रम आहे
- हिंदी
- मराठी
- इंग्रजी
➻ दुसऱ्या अटी अनुसार भूगोल व मराठी या पुस्तकांच्यामध्ये गणित व हिंदी ही दोन हे पुस्तक ठेवलेले आहे
➻ तर, आपल्याकडे क्रमाने क्रम आहे
- भूगोल
- गणित
- हिंदी
- मराठी
➻ तिसऱ्या अटी अनुसार इंग्रजी व विज्ञान या पुस्तकांच्यामध्ये भूमिती हे पुस्तक
➻ तर, आपल्याकडे क्रमाने क्रम आहे
- इंग्रजी
- भूमिती
- विज्ञान
➻ तर आता आपल्याजवळ सात पुस्तकांचा विशिष्ट क्रम आहे
- भूगोल
- गणित
- हिंदी
- मराठी (मध्य भागात स्थित असलेले पुस्तक )
- इंग्रजी
- भूमिती
- विज्ञान
➥अंतिम उत्तर :
- ➽ मध्यभागी मराठी पुस्तक आहे.
- ➽ म्हणुनच विकल्प B) मराठी हा योग्य पर्याय आहे.