Math, asked by rinadhakade99, 11 hours ago

एका तिजोरीत 1734रु आहे ती सर्व नाणी आहे 50पैसे,1रु,2रु,5रु ची नाणी समान संख्येत तर त्यातील 50 पैशाची ऐकूण नाणी किती?

Answers

Answered by Sauron
128

Answer:

तिजोरीत 50 पैशांची एकूण 204 नाणी आहेत.

Step-by-step explanation:

दिलेले आहे :

  • तिजोरीत असणारी एकूण रक्कम = 1,734 रु
  • तिजोरीत असणारी नाणी = 50 पैसे, 1 रु, 2रु, 5रु
  • तिजोरीत असणार्‍या नाण्यांची संख्या समान आहे.

शोधा :

  • 50 पैशाची एकूण नाणी

स्पष्टीकरण :

तिजोरीतील सर्व नाणी समान संख्येत आहेत.

त्यामुळे, मानूया

  • नाण्यांची संख्या = x

⇒ 50 पैसे = 0.5 रु

दिलेल्या प्रश्नानुसार :

⇒ 0.5x + 1x + 2x + 5x = 1,734

⇒ 0.5x + 8x = 1,734

⇒ 8.5x = 1,734

⇒ x = 1,734 / 8.5

x = 204

नाण्यांची संख्या = 204

• 50 पैशाची एकूण नाणी = 204

• 1 रु. ची एकूण नाणी = 204

• 2 रु. ची एकूण नाणी = 204

• 5 रु. ची एकूण नाणी = 204

नाण्यांची किंमत :

  • 50 पैसे नाणी = 204 × 0.5 = 102 रु.
  • 1 रु. ची नाणी = 204 × 1 = 204 रु.
  • 2 रु. ची नाणी = 204 × 2 = 408 रु.
  • 5 रु.ची नाणी = 204 × 5 = 1,020 रु.

एकूण रक्कम = 102 रु. + 204 रु. + 408 रु. + 1,020 रु.

एकूण रक्कम = 1,734 रु.

तिजोरीत 50 पैशाची एकूण 204 नाणी आहेत.

Similar questions