India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

एकता या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
0

एकतेतच सर्वकाही आहे, म्हणतात ना "युनिटी इझ स्ट्रेन्थ ".  घर असो वा शाळा, नोकरी असो वा व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात एकता असल्यास कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी लवकर मार्ग सापडतो.  सर्वांनी सहमताने एकत्रित राहिल्यास तणावमुक्त जीवन आपण जगू शकतो असे म्हटलेले आहे. एकतेमुळे कुटुंबातील लोक एकमेकांचा आदर करतात आणि काळजी घेतात, मुलांमध्ये निरोगी वातावरण निर्माण होते, ते समाजाच्या विकासासाठी चांगले आहे. कुठलेही राष्ट्र एकतेशिवाय उभे राहू शकत नाही. एकत्रित होण्यासाठी वैयक्तिक मतभेद व स्वार्थ सोडून सर्वांनी मिळून मिसळून राहणे व आपले कर्तव्य पार पाडणे यातच सर्वांचे हित आहे, जसे कि पूर, चक्रीवादळ,  दुष्काळ,  भूकंप इत्यादी सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी सर्वानी एकत्रित मिळून-मिसळून राहावे व सर्वाना मदत करावी.

Similar questions