India Languages, asked by kimayashelar800, 8 months ago

एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर
येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात.
जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात
तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा
त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं
नक्कीरक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा
गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा






can you please give me the remaining story? ​

Answers

Answered by 2105rajraunit
2

एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर

येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात.

जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात

तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो,

कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे

... आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल.

पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून

जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस

पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो.

तो पुजार्याला पाठीवरून वाहून

न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते

नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण

तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोप्तर

येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण

तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं

आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो.

तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात

जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे

तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त

असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव

हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक

होडी आणि एक हेलीकोप्तर पाठवलं होतं. तू

दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस."

पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व

संधी गमावल्या होत्या.

मित्रानो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य

संधी येऊन जात असतात पण

त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते.

एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक

चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य

संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.

I hope that it will be helpful to you.

Similar questions