History, asked by chanduw38, 13 hours ago

१) एकविसाव्या शतकामध्ये मराठी भाषेची स्थिती तुमच्या शब्दात स्पष्ट करा.​

Answers

Answered by PreetVaishnav00
3

७ फेब्रुवारी हा मराठी ... खरे तर आज मराठी भाषेच्या ... मराठीच्या

Answered by manishabansode404
7

Answer:

एकविसाव्या शतकात काय बदल होतील हे समजून घेण्याची उत्सुकता सध्या आपल्या देशात सर्वत्र आढळून येते. विसाव्या शतकात दोन महायुद्धे, अणुबाँबचा शोध, साम्यवादाचा उदय आणि अस्त अशा महत्त्वपूर्ण गोष्टी घडल्या. विज्ञानाची प्रगती अशीच चालू राहिली तर पुढच्या शतकातसुद्धा अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून येतील असे मानायला जागा आहे.

आजवरच्या वैज्ञानिक प्रगतीचा आढावा घेतला तर असे स्पष्ट होते की ज्या प्रमाणात भौतिकशास्त्रात प्रगती झाली त्या प्रमाणात ती मानव्यशास्त्रात झाली नाही. एवढेच नव्हे तर मूलभूत मानवी स्वभावात फारसा बदल झालेला नाही. साम्यवाद अयशस्वी होण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. जोपर्यंत दुसऱ्याच्या खिशातून आपल्या खिशात पैसा येण्याचा संभव असतो तोपर्यंत माणूस साम्यवादी असतो जेव्हा स्वतःच्या खिशातून दुसऱ्याच्या खिशात पैसा जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा माणूस साम्यवादाचा त्याग करतो हे कटू सत्य सिद्ध झाले आहे.

हुकूमशाहीशिवाय साम्यवाद टिकू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सारांश मूलभूत मानवी स्वभाव साम्यवादाला अनुकूल नाही असे दिसते. थोडक्यात म्हणजे ज्या प्रकारच्या समाजरचनेत स्वहिताचे संवर्धन करता येईल त्या प्रकारची समाजरचना मानवी स्वभावाशी सुसंगत ठरते. मुक्त अर्थव्यवस्था पूर्णपणे निर्दोष नसली तरी तुलनेने मानवी स्वभावाशी अधिक जुळणारी आहे असे म्हणणे भाग आहे. तेव्हा एकविसाव्या शतकात जगात मुक्त अर्थव्यवस्था राहील असे दिसते. मुक्त अर्थव्यवस्थेला लोकशाही सुसंगत असते. तेव्हा आगामी शतकात लोकशाही टिकून राहील असे मानायला हरकत नाही.

लोकशाही आणि मुक्त अर्थव्यवस्था या दोन मूल्यांच्या संदर्भचौकटीतच होणारे इतर बदल होतील असे म्हणता येईल. एकविसाव्या शतकाच्या भाषेकडून कोणत्या अपेक्षा असतील या प्रश्नांचा विचार लोकशाही आणि मुक्त अर्थव्यवस्था यांच्या पार्श्वभूमीवर केला पाहिजे. भाषेचा वापर हा एक सामाजिक व्यवहार असतो. सर्व सामाजिक व्यवहाराचे माध्यम भाषा हे असते. माध्यम हे एक साधन असते, साध्य नव्हे. साध्याच्या संदर्भातच साधनाला महत्व असते. तेव्हा सामाजिक व्यवहाराच्या सुकरतेसाठी भाषेत बदल होत राहतात. भाषेच्या नियमांसाठी सामाजिक व्यवहार बदलत नाहीत. म्हणून भाषिक व्यवहारांचा दबाव व्याकरणावर असतो.

व्याकरणाचा दबाव भाषिक व्यवहारावर राहण्याचे दिवस पूर्वीच संपलेले आहेत. आता व्याकरणाचे आदेशात्मक स्वरूप जाऊन त्याला वर्णनपर स्वरूप आलेले आहे. एकविसाव्या शतकात भाषिक व्यवहारातील आदेशात्मक नियमांचे दडपण अधिकाधिक कमी होत जाईल. असे हे दडपण कमी झाल्यामुळे भाषांचे स्वरूप बदलत जाईल हे उघड आहे. ते कसे बदलत जाईल हे मराठी भाषेच्या संदर्भात पाहू. एकविसाव्या शतकात मुक्त अर्थव्यस्थेमुळे खासगी क्षेत्राचा विकास होईल सार्वजनिक क्षेत्राचा संकोच होत राहील. अर्थव्यवहाराचा प्रभाव राज्यव्यवहारावर राहील. म्हणजे शासनावर उद्योजकांचा दबाव राहील.

अर्थव्यवहाराच्या गरजांनुसार मराठी भाषा बदलत राहील. अर्थव्यवहारात भाषेची शुद्धता आणि सौंदर्य हे मुद्दे गैरलागू ठरतात. अर्थव्यवहाराचे जागतिकीकरण होईल. जगातील विविध भाषिक लोक अर्थव्यवहारासाठी मराठी भाषिकांच्या संपर्कात येतील. या सर्व भाषांतील शब्द भाषिक व्यवहारात सर्रास वापरले जातील. भाषिक व्यवहारातील मराठी भाषेत परभाषांतील असंख्य शब्द प्रवेश करतील. स्थिर होतील. मिसळूनही जातील. आज आपण ज्यांना मराठी शब्द मानतो त्यापैकी असंख्य शब्द फार्शी आहेत. ते फार्शी आहेत हे फक्त भाषाशास्त्रज्ञ जाणतात. परभाषिक शब्दांचा एक प्रचंड लोंढा मराठी भाषेत प्रवेश करील. शुद्धतेचा आग्रह धरणारी प्रवृत्ती या लोंढ्याच्या किनाऱ्यावर राहील. लोंढ्यात खडकाप्रमाणे स्थिर उभी राहील, किंवा लोंढ्याबरोबर वाहत जाईल. काही झाले तरी या प्रवृत्तीचा या लोंढयावर फारसा परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही.

परभाषांतील शब्दांबरोबरच परभाषांतील वाक्ये किंवा वाक्यांशसुद्धा मराठी भाषेत प्रवेश करतील. जसे ‘सी यू’, ‘सो लाँग’, ‘बॉन व्हॉयेज’, ‘ये हुई ना बात’ इत्यादी. दहा वाक्यांच्या बोलण्यात दोन तीन वाक्ये इंग्रजी एकदोन वाक्ये हिंदी व बाकीची मराठी असेसुद्धा प्रमाण राहील. ही प्रक्रिया चालू असताना शुद्ध भाषेचा आग्रह धरणाऱ्या प्रवृत्ती अनुवादाचा मुद्दा मांडतील. काही परभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवतील. पण तो प्रयत्न फारसा यशस्वी होणार नाही. पाव लिटरच्या भांड्यात पंचवीस लिटर दूध कसे मावणार?

याचा अर्थ असा नाही की शुद्ध मराठी कोठेच ऐकायला मिळणार नाही. एकही इंग्रजी शब्द न वापरता तासतासभर भाषण करू शकणाच्या व्यक्ती आजसुद्धा बघायला मिळतात. त्यांचा गौरवपर उल्लेखही होतो. याचा अर्थ या व्यक्ती अपवादभूत आहेत. हे अपवाद नेहमीच राहतील. पण त्यांचे प्रमाण कमी कमी होत राहील. ही प्रक्रिया अटळ आहे. यापूर्वी झालेले सावरकरादिकांचे भाषाशुद्धीचे प्रयत्न अयशस्वी झालेले होते. हे या संदर्भात आठवून पाहावे. अर्थव्यवहारामुळे मराठी भाषेत घडून येणाऱ्या या बदलाचा प्रसार वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि आकाशवाणी या माध्यमांच्या प्रभावामुळे अर्थेतर व्यवहारातील भाषेवर झाल्याशिवाय राहणार नाही.

आता एकविसाव्या शतकातील ग्रामीण भागातील भाषेची स्थिती कशी राहील याचा विचार करू. ग्रामीण भाषेतील बरीचशी शब्दसंपत्ती शेतीशी संबंधित असते. ती शब्दसंपत्ती बरीच वर्षे टिकून राहील. पण कायम टिकून राहील असे म्हणवत नाही. शेतकऱ्यांची मुले आता शिकू लागलेली आहेत. शेती विद्यापीठे निघालेली आहेत. शेतीव्यवहारात सुधारलेली यंत्रे तंत्रे, बियाणी, खते, कीटकनाशके, तणनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाला आहे आणि होईल.

Similar questions