एखादा नवीन व्यवसाय / धंदा चालू करण्यासाठी कशाकशाची गरज आहे असे तुम्हाला वाटते?
Please give answer in marathi
Answers
असे विचार करण्याचे कारण म्हणजे या जगाला तुम्ही काहीतरी नवीन आणि उपयुक्त असे देण्याचा जो पर्यंत प्रयत्न करणार नाही तो पर्यंत तुमचा व्यवसाय मोठा होणार नाही.
मग तुम्ही सेवा द्या किंवा प्रॉडक्ट द्या तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी आणि उत्तम रीतीने चालवण्या साठी तुम्हाला हा विचार करावाच लागेल.
लोकांच्या अडचणी कमी करणाऱ्या किंवा गरजा भागवणार्या व्यवसायाच्या ज्या कल्पना तुम्ही निवडल्या आहेत त्यापैकी कशात तुम्हाला जास्त आवड आहे ते तपासा.
आवड म्हणजे जे काम केल्यावर तुम्हाला आनंद मिळतो.आपली आवड ही अशी पाहिजे जी काळानुरूप बदलली नाही पाहिजे.
बऱ्याचदा असे होते १-२वर्ष आपण एक व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतो आणि नंतर ते काम किंवा व्यवसाय करताना कंटाळा येतो आणि त्याचाच परिणाम तुमच्या व्यवसायावर होतो.
त्यामुळे तुमची आवड कश्यामध्ये आहे ते ओळखा. जे काम तुम्ही वर्षानुवर्षं सतत जरी केले तरी तुम्ही त्यात आनंदी असाल आणि जो व्यवसाय केल्यावर तुम्हाला समाधान मिळते असा व्यवसाय / धंदा निवडा.