World Languages, asked by suryamps4651, 10 months ago

एखाद्या राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्यांची किंवा सरकारी अधिकाऱ्याची भेट घ्या. भारतासमोरील सामाजिक व राजकीय समस्यांबाबत त्यांचे विचार जाणून. त्या समस्या सोडविण्यासाठी आपण काय उपाय सुचवाल ते लिहा.​

Answers

Answered by BRAINLYADDICTED
22

आपले उत्तर :-

_________________________________

समस्येवर निर्णय घेताना अगदी चोख घेतला पाहिजे कारण आपण निर्णय हा समाजाच्या कल्याणसाठी घेत आहोत .

निर्णय घेताना समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या हक्काला व प्रतिमेला तडा जाता कामा नये .

आपण सार्वजनिक ठिकाणी महिलांनाही समान हक्काची मावणी करू .

तसेच गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व जेवण करण्याची सोय असावी .

तसेच सर्व व्यक्तींनी आपल्या आई बाबा ना त्यांच्या म्हातारपनि काळजी घेऊन स्वतःच्या सोबत ठेवण्यासाठी सरकार ने नवीन नियम बनवला पाहिजे.

असे इत्यादी

_________________________________

धन्यवाद!

Answered by sgk51
2

Answer:

मी नुकतीच एका ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्याची भेट घेतली व त्यांच्याशी भारताला भेडसावणाऱ्या विविध राजकीय समस्या जश्या नैसर्गिक प्रदूषण, पर्यावरणाचा ह्रास, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नोकरी व्यवसाय व रोजगार, इत्यादी विषयांवर त्यांच्याशी बातचीत केली व त्यांचे विचार जाणून घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वच समस्यांवर एकच रामबाण उपाय म्हणजे चांगले शिक्षण हाच आहे.

मी याबद्दल वर्गात सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली व त्या सोडविण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील हे पाहिले.

आम्हा विद्यार्थ्यांना सुचलेले काही विचार पुढीलप्रमाणे आहेत.

१. सर्वांनी खूप चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे.

३. चांगल्या शिक्षणामुळे प्रदूषण नेमकं कशामुळे होतंय हे कळेल व त्यावर योग्य उपाय केल्यास व जास्तीत जास्त झाडे लावल्यास पर्यावरणाचा ह्रास थांबेल. कचऱ्यापासून चांगलं खत बनवता येईल.

३ चांगल्या शिक्षणामुळे आपण योग्य उमेदवार निवडून देऊ जे सामाजिक समस्या चांगल्या पद्धतीने सोडवू शकतील.

४ लोकसंख्या कमी केल्यास तसेच कौशल्य विकास आधारित शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या संधी निर्माण होतील व त्यामुळे निर्माण झालेल्या अनेक समस्या सुटतील.

५. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली किड आहे चांगल्या मूल्य शिक्षणामुळे ती समस्या देखील सुटेल.

Explanation:

वरील उत्तर आणखी छोटे किंवा मोठे तुम्ही तुमच्या प्रमाणे लिहा. धन्यवाद.

                                                      My Car                                                                        

Attachments:
Similar questions