ekka bota varchyaa shaahi chya kimmat essay in marathi
Answers
Answer:
hi you are also speak Marathi I am too
Explanation:
खूप वर्षांपूर्वी मुखवटे हे पुस्तक वाचनात आलं होतं. त्यातलं गौरीच्या मुखवट्यांचं वर्णन, एकेकाळी घट्ट असणारी कृषीसंस्कृतीची वीण केवळ रुढींच्या मुखवट्यांवर टिकून असण्यावर आधारित कथा यांनी भुरळ घातली होती. त्याच आ.वि.जातेगावकरांचं 'अस्वस्थ वर्तमान' हे अलीकडचं पुस्तक.
कादंबरीत पात्रे असतात. एकमेकांचे नातेसंबंध, घटना, भावना यांची वीण गुंफत कादंबरी आकार घेत असते. ’अस्वस्थ वर्तमान’ ह्या कादंबरीतील पात्रे म्हणजे नायकाच्या मनात त्याने वाचलेल्या , अनुभवलेल्या लांबच्या ते नजीकच्या भूतकाळातील विविध कलाकृती. वर्तमानकाळ अस्वस्थ आहेच पण तो ज्या भूतकाळाच्या खांद्यावर उभा आहे तो भूतकाळ तरी कुठे शांत, समंजस होता? आता आहे तो गोंधळाचा काळ आहे आणि पूर्वी सगळं सुशेगाद होतं असा सूर कायम आणि कोणत्याही काळात सतत वाजत असतो. तो खरा असतो का? अर्थातच नाही. दुरून बघताना आपल्याला शांत वाटणार्या त्या काळात, घटनांत अनेक ताणेबाणे असतात आणि त्यांची वर्तमानापर्यंत आलेली गुंफण वर्तमानालाही झाकोळत असते. त्या त्या काळातल्या कलाकृती त्या त्या काळाचं प्रतिबिम्ब असतात. त्या कलाकृती, मग ते लिखाण असो, सिनेमा, नाटक वा एखादी घटनासुध्दा- केवळ तो काळ उलगडून मांडत नाहीत तर वर्तमानाला आरसा दाखवतात. अश्या आरश्यात भूतकाळाचा गोंधळलेला चेहरा दिसतो तेव्हा वर्तमानाचं अस्वस्थपणामागची अपरिहार्यता ध्यानी येते.
संवेदनाशील रसिक कोणत्याही कलाकृतीत स्वत:चा आरसा शोधत असतो. तसेच या कादंबरीतले इतिहासाचे प्राध्यापक अशोक गोरे. वाचलेल्या, अनुभवलेल्या साहित्यातील पात्रे, घटना यांना स्वत:च्या मनाशी, आयुष्याशी तोलुन बघताना आढळतात. या प्रक्रियेत एकेका पुस्तकाचे, घटनांचे सुरेख विश्लेषण केले जाते. नायक स्वत:च्या आयुष्याला विवेकवादाच्या तराजूत तोलताना त्याला मार्गदर्शन होतेय ते आयुष्यभर सोबत असलेल्या कलाकृतींचे. विवेकवाद सोपा नाही आणि निखळही नाही. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य या वर्गीकरणातही पिढ्यानपिढ्यांचे विचार, संस्कार, समजूती आणि सोसावे लागलेले, केलेले आघात यांची सरमिसळ असतेच आणि ती व्यक्तीसापेक्षही नसते. त्यामुळे विवेकवादाला माणूसकीचा चेहरा असावा लागतोच पण तो चेहराही एक नसतो तर अनेक असतात. माणूसकी, विश्वरूप हे अनेक चेहर्यांनी पुढे येतं तेव्हा गोंधळ अजूनच वाढतो.
चैत्यभूमीवरील गर्दी न्याहाळताना हे चिंतन चालू होतं. अभिजन आणि बहुजन यामधला सांस्कृतिक, वैचारिक फरक हा निव्वळ फरक नसतो तर आपल वर्चस्व रहावं यासाठीची खेळी असते. यात डावं-उजवं नसतं. दोन्ही बाजू असतात. नायक एका बाजूचा आहे. भारतीय समाजात ती बाजू त्याला जन्मजात मिळालेली आहे. त्या बाजूला असूनही दुसर्या बाजूचा विचार करत सत्य बघण्याचा खेळ त्याच्या मनाने मांडला आहे. हा खेळ तपश्चर्येसाठी वनात जाता यावं म्हणून वेडेपणाचं ढोंग रचणार्या बोधिसत्वाच्या तेमिय अवतारापासून सुरू होतो. जातीबाहेर लग्न करणार्या मुलीला लिहीलेलं विश्रब्ध शारदेतलं पत्र, शाहूमहाराज-टिळक, वेदोक्त प्रकरण, सत्तावनचं बंड, क्राईम अँड पनिशमेंट या सगळ्यातून चिंतन करत पुढे सरकत रहातो. "राजा चैनीत रहातो आणि प्रजेतील एखाद्याला दारिद्र्यामुळे कराव्या लागणार्या चोरीचा न्यायनिवाडाही तोच करतो तर तो न्याय कसा असेल" असं म्हणत राज्यच नाकारणारा तेमिय आणि आपण प्रज्ञावंत मूठभरातील आहोत असं म्हणून खून करणारा आणि त्याची टोचणी लागल्यावर आपण सगळ्यांमधलेच आहोत हे उमगल्यावर नैतिकता म्हणून गुन्ह्याची कबुली देणारा रास्कालनिकोव्ह यात एक जगावेगळ्या प्रामाणिकपणाचा धागा आहे. हा प्रामणिकपणा प्रत्येकाकडे असणार नाही, स्वत:च्या कृतीचं, विचारांचं धर्म,जात निरपेक्ष विश्लेषण प्रत्येकजण करू शकणार नाही. म्हणूनच अश्यांची वाट एकाकीच असते. त्या विचारांना समानधर्मी मिळत नाहीत आणि अस्वस्थपणा सोबतीला रहातो. या अस्वस्थतेला विश्वाबद्द्लची करुणा हेच एक उत्तर. पण तेही स्वप्नातलं उत्तर आणि जागेपणात उरणारा त्याचा "पुढे काय कळत नाही" हा प्रतिध्वनी.
या कादंबरीची पात्रे असलेल्या कलाकृती वाचल्या-पाहिल्या असतील, इतिहास, वर्तमान , राजकारण याची थोडीफार जाण असेल पण त्याबद्द्लचा हट्टाग्रही दृष्टीकोन नसेल तर हे पुस्तक नक्कीच आवडेल. पण ठराविक चाकोरीतल्या आणि "गर्व है" संस्कृतीतच वाढलेल्यांनीही हे पुस्तक आवर्जून वाचावं. एक वेगळा फॉर्म म्हणूनच नाही तर चूक आणि बरोबर यामधली रेष कशी धारदार असते हे समजून घेण्यासाठी, विचारांशी खेळणं कसं असतं ते बघण्यासाठी. कारण अश्या खेळातूनच एका टोकाला जाणं टाळता येतं.