Esay on topic aai baba mla tumhala kahi sangaychay in marathi
Answers
Answer:
आज दहावीचा निकाल होता. सुरभी खुप टेन्शन मध्ये होती.पेपर हवे तसें गेले नव्हते आणि यावर्षी बोर्डानी तोंडी परीक्षेचे मार्क्स पण बंद केलेले. त्यामुळे पास होऊ की नाही याबाबत तीला शंकाच होती... "अग, किती वाजता आहे ग निकाल" सुरभींची आई "एक वाजता लागेल निकाल"सुरभी नेट पॅक वगैरे आहेना, नाहीतर रिचार्जे करून घे. वेळेवर पंचाईत नको .... आई उत्साहाने बोलत होती.. दरवर्षी चांगल्या गुणांनी पास होणारी सुरभी यावर्षीही चांगले गुण मिळविणारच असा आईला पक्का विश्वास होता. सुरभी मनात म्हणाली किती अपेक्षा आहे ना आईला.... इथे आपले पास व्हायचे वांधे... अग, किती वाट पाहते आई... निकाल लागल्यावर कळणारच... एक ला नाही तर दोन वाजता कळेल.... असं कस? तुला इतके चांगले क्लास लावले तेव्हा चांगले मार्क्स तर चांगले मिळणारच..... "अग, मी निघतो ऑफिसला. निकाल लागला की कळवा, काय दिवे लावले तुमच्या लेकीने. मला तर शंकाच आहे कारण वर्षभर मित्र मैत्रिणी आणि मोबाईल. आपण एवढे कष्ट करून शिकवितो पण काही जाणीव नसते यांना. सगळं मिळत ना तेव्हा किंमत नसते. आम्हाला गाईड घ्यायला पैसे नसायचे. याचे त्याचे पुस्तकं वापरायचो"सुरभीचे बाबा सुरभीला मात्र आता भीती वाटायला लागली... आई, मला तर आता भीतीच वाटायला लागली. आई माझ्या अंत्यसंस्काराची तयारी करून ठेव.... हसत हसत सुरभी म्हणाली.... सुरभी काय बोलतेस तू... यानंतर असं बोलायचं नाही.... आई रागावली... अग आई, गंम्मत केली.... अशी गंम्मत नाही करायची बेटा.... विनोदी स्वभावाची सुरभी नेहमीच बोलताना विनोद करायची... हसत खेळत ती नेहमीच असं काही बोलायची म्हणुन आईला तिच्या बोलण्याची गंम्मत वाटली. एक वाजला आणि आईच सुरु झालं.... तिच्या शेजारी बसत म्हणाली, बघ ना सुरभी.... लागला असेल निकाल.. अग आई, साईट नाही उघडत.... सगळे एकदम निकाल बघतात त्यामुळे बरेचदा साईट उघडत नाही... एकदाची साईट उघडली... तिने देवाचे नाव घेतले आणि रोल नंबर टाकला... Result आला.. पास.. 47 टक्के... बाजूला बसलेली आई म्हणाली... किती मिळाले ग... आई मी पास झाली... पास तर होणारच होती.. मार्क्स किती पडले.. 47 टक्के... हो का.. त्या रीमा ला किती, नीती ला किती... आई तिच्या मैत्रिणीची चौकशी करू लागली ... सगळ्यांना सुरभीपेक्षा जास्त मार्क्स मिळाले होते... त्यांना कसे चांगले मार्क्स मिळाले ग? त्यांचे आणि तुझे कलासेस तर सेम होते ना? सुरभी मनात म्हणाली, आईला दुःख कशाचे आहे मला कमी मार्क्स मिळविण्याचे आहे की माझ्या मैत्रिणींना जास्त मार्क्स मिळाले याचे .. आई, अग माझे पेपर चांगले नव्हते गेले.अग मी अभ्यास केला पण गणिताच्या आणि विज्ञानाच्या पेपरला ब्लँक होऊन गेली. मला काही आठवतच नव्हतं ग.... आई, बाकी विषयात मला चांगले गुण आहेत. मी कला शाखेला जाते. मी गणित आणि विज्ञान सोडते... ठीक आहे जशी तुझी इच्छा . तू काळजी करू नको. पण बाबांना कस सांगायचं ग? सुरभीने बाबांना फोन केला नाही... चार वाजता बाबांचा फोन आला.काय? पास तर झालीना."अहो, पास झालीय आपली सुरभी . यावर्षी निकाल थोडा कमीच लागला.सगळ्यांना कमी गुण मिळाले. बोर्डाने तोंडी परीक्षेचे गुण कमी केले ना त्यामुळे बरेच जण नापास झाले "आईने स्पष्टीकरण दिले मला फालतू गोष्टी सांगू नको.. किती टक्के मिळाले तेवढं बोल..47 टक्के...