Essay about goat in Marathi
Answers
Answer:
here is ur answer bro /siss
■■बकरी (goat) वर निबंध■■
बकरी एक महत्वपूर्ण पाळीव प्राणी आहे. बकरीचा उपयोग मनुष्य प्राचीन काळापसून करत आलेला आहे. बकरी गवत, धान्य, वनस्पति आणि झाडांची पाने खाते. आपल्याला बकरी जवळजवळ दुनियाच्या प्रत्येक कोपऱ्यात पाहायला मिळते.
बकरीचा सरासरी जीवनकाळ १०-१२ वर्षे असते. बकरीची पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण असते. तसेच तिची स्मरणशक्तिसुद्धा तीक्ष्ण असते.
मानव जातीसाठी बकरी खूप उपयोगी असते. बकरीपासून माणसाला दूध मिळतो. हा दूध खूप पौष्टिक असतो. नवजात बाळाला बकरीचा दूध खूप फायदेशीर ठरतो.
बकरीच्या शिंगांचा प्रयोग वस्तू बनवण्यासाठी केला जातो. डोंगराळ भागामध्ये बकरीचा उपयोग भार नेण्यासाठी केला जातो. काही लोकं बकरीचा मांस आवडीने खातात.
बकरी मनुष्याची खूप वर्षांपासून मदत करत आहे. अशा प्रकारे, बकरी खूप महत्वाची तसेच मानव जातीसाठी उपयोगी प्राणी आहे.