Art, asked by aishwaryamiragane5, 1 year ago

essay about Marathi chi thorvi in Marathi

Answers

Answered by purvapednekar
3

Answer:

लहान मुल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते कुठलीही भाषा शिकलेले नसते; पण पहिल्यांदा त्याच्या गुजगोष्टी चालतात त्या त्याच्या आईबरोबर ! म्हणून त्याच्या मातेची भाषा तीच त्याची मातृभाषा; परंतु माणसाला मातृभाषाच गवसली नसती, तर त्याने काय केले असते ? बाळाने आपला हट्ट आईकडे कसा व्यक्‍त असता ? प्रत्येकाचे जीवन माती, मायभूमी व मातृभाषा या तीन बिंदूंनी बनलेला एक त्रिकोणच असाते. यापैकी मातृभाषा जन्मापासून त्याला संस्कारांचे बाळकडू पाजत असते. अनुभवाचे बोल त्याला शिकवते. तीच त्याने अंगिकारली नाही, तर इतर कितीही भाषा तो बोलला तरी त्याचं आयुष्य समृद्ध होईल का ?

अभिमान प्रत्येकालाच असतो. माणूस जरी बहुभाषिक झाला तरी सुखदु:खात त्याच्या मुखातून सहजपणे शब्द उमटतात ते त्याच्या मायबोलीतलेच. परदेशांत अन्य भाषिकांच्या गर्दीत वावरत असतांना आपल्या मायबोलीतील शब्द कानावर पडले, तर सासुरवाशिणीला माहेरचे माणूस भेटावे तसा आनंद होतो आणि तो अवर्णनीय आहे.

प्रत्येक भाषेचा एक वेगळा साज, वेगळा ढंग असतो. अशीच आपली मराठी भाषा! मराठी भाषा रांगडी मानली जाते. मराठी भाषेने चांगली शब्दसंपदा नेहमीच स्वीकारली आहे. म्हणून तिचे शब्दभांडार वाढले आहे.

संस्कृत-प्रांकृत- मराठी हा तिचा प्रवासही मोठा लक्षणीय आहे. आपल्याला लाभलेली ही वैभवशाली मराठी भाषा किती प्राचीन आहे. मराठीची गंगा प्राकृताच्या पर्वतातून निघाली; पण तिला तिर्थाचे स्वरूप ज्ञानेश्वरांनी आणले.

“माझा मराठाचि बोलू कवतुके परि अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन” या शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी मायमाऊली मराठी भाषेची अशी थोरवी गायली आहे. मातृभोतून आपले विचार शेखठोकपणे व विलक्षण तळमळीने व्यक्‍त करून तुकाराम महाराजांनी अभंगरचना केली; जी इंद्रायणीत बुडूनही अमर राहिली.

रामदासांचे `मनाचे श्लोक’ आणि `दासबोध’ या ग्रथांनी भाक्‍तिमार्गांबरोबरच संसाराची शिकवण दिली, असे प्राचीन संत, वाड्मय आपल्या मराठी भाषेचे अनमोल लेणं आहे, नाही का ? मायबोली मराठी ही प्रेमकवितांमध्ये फुलांसारखी नाजूक वाटते, तर विडंबन काव्यांमध्ये पोट धरधरून हसवते आणि तीच मराठी ऋषींच्या शापांमध्ये दगडाहून कठोर वाटते. भाषा बारा कोसांवर बदलते. ही गोष्ट मराठीच्या बाबतीत अगदी सार्थ आहे. पाच-दहा गावे सोडली की, मराठी बोलण्याची पद्धत बदलते; परंतु “ऋषींचे कुल व भाषेचे मूळ शोधू नये म्हणतात; पण हा दंडक जरा बाजूला करून पहायला गेले तर `श्रवनबेळगोळ येथे इ.स. ८०० साली उभारलेल्या बाहुबलीच्या मूर्तीच्या पायाशी `चामुंडराये करवियले, गंगराज सुत्ताले करवियले’, असा शिलालेख आढळतो त्यानंतर साधारपणे ११ व्या शतकात कवी मुकुंदराज यांनी मराठी भाषेतील `विवेकसिंधू’ हा पहिला ग्रंथ लिहिला; पण मराठीला खर्‍या अर्थाने साज चढविला संत ज्ञानेश्वरांनीच! पण आज मराठी भाषा म्हणण्यासारख्या संपन्न अवस्थेत नाही. खरोखरच आज वैभवशाली मराठीची काय अवस्था आहे ?

आजकालच्या विद्यार्थ्यांना शेक्सपिअरची नाटके घडाघड पाठ आहेत; पण गडकर्‍यांचा एकही नाटकाचं नाव माहिती नाही. हे आपले दुदैव! `मराठी भाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे’ अशी हाकाटी करणारे आपल्या मुलांना

मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण देतआहेत. खरंतर मराठीतून शिक्षण घेणे आज मागासलेपणा समजला जातो. आजकाल मराठी मुलं-मुली एकमेकांशी बोलतांनासुद्धा इंग्रजी भाषेचा वापर करतात. ही विसंगती पाहून पु.ल. म्हणतात, `यांना हल्ली मराठी वर्डस् रिमेंबर करायला डिफिकल्ड जातात’ आजकाल इंग्लिश बोलणे सुधारले पणाचे प्रतिष्ठेच मानले जाते. खरंच का इंगिलशच्या कुबड्या एवढ्या आवश्यक आहेत.

Similar questions