essay in Marathi about corona and swach Bharat
Answers
Answer:
this is your answer
Explanation:
1.corona: मागील दोन ते तीन आठवड्यांपासून आपणा सर्वांना कोरोना विषाणूमुळे होणाºया कोविड-१९ या आजाराने भयभीत करून सोडले आहे. मला खात्री आहे की लवकरच या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रतिबंधक लसाची आणि त्यावरील उपचारासाठी लागणाºया औषधांचा शोध होऊन त्याची निर्मिती सुरू होईल आणि सर्व काही सुरळीत होईल.
जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे माझ्या दृष्टीने या कोरोना विषाणूने त्याचे दोन्ही बाजू आपणास दाखविल्या आहेत. एका बाजूने तो जरी आपणास शाप ठरत असताना, त्याची दुसरी बाजूही पाहणे अत्यंत गरजेचे आहे. मी त्या दोन्ही बाजूंचा विचार करूनच हा लेख लिहित आहे.
मागील तीन आठवडे मी जेव्हा या भयानक कोरोना विषाणूवर विचार करीत आहे तेव्हा मला अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. त्यापैकी मी काही गोष्टी मांडत आहे. या कोरोना विषाणूने मात्र जगातील सर्व मनुष्यजातीला काही प्रचंड शिक्षा आणि शिकवण व बºयाच गोष्टींची आठवण करून दिली आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
या कोरोना विषाणूमुळे आपली भारतीय संस्कृती किती थोर आणि महान आहे याची प्रचिती पावलोपावली येत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा कोरोना विषाणू आपणास बाहेरून घरात आल्यानंतर हात आणि पाय स्वच्छ धुवायला भाग पाडत आहे. वापरलेले कपडे व्यवस्थित खुंटीवर ठेवण्यास भाग पाडत आहे. जेव्हा दोन व्यक्ती भेटतात तेव्हा त्यांना दोन्ही हात जोडून नमन करण्यासाठी नमस्कार करावयास भाग पाडत आहे. दोन व्यक्तींमध्ये संभाषण चालू असताना त्यांच्यात एक मीटरचे सुरक्षित अंतर ठेवण्यास भाग पाडत आहे. स्वत:चे, घरातील आणि परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. आपल्या भारतातील काही समाजातील लोक तोंडावर मास्क लावून बोलत असतात, या मास्कचे महत्त्व यानिमित्ताने पुढे येत आहे.
या कोरोना विषाणूमुळे जनतेला स्वत:हून जनता कर्फ्यू पाळून घरात बसवण्यास भाग पाडत आहे. घरातील व्यक्तींशी सुसंवाद करण्यासाठी भाग पाडत आहे. कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसून जेवत आहेत, एकत्र बसून स्वत:च्या कुटुंबातील भूतकाळातील अनेक महत्त्वाचे प्रसंग, सुख-दु:खाच्या, मंगलदायी, गमतीजमती यांची उजळणी करावयास भाग पाडत आहे. ज्यांचे आरोग्य कमकुवत आहे त्यांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यास भाग पाडत आहे. प्रत्येकास नित्यनियमाने दररोज व्यायाम करण्यास भाग पाडत आहे़ बºयाच व्यक्तींना घरातील खरी परिस्थिती जाणवून देत आहे.
2. Swatch bharat: स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ भारत मोहिम भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. प्रधान मंत्रींनीं २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. राष्ट्रीय स्तरावर या अभियानाची दखल घेतली जात आहे. स्वच्छ भारत अभियान या मोहिमेचा एक मुख्य ध्येय आहे भारतातील सर्व शहरे आणि गावे “ओपन डेफकेशन फ्री” म्हणजेच हागणदारी मुक्त करणे. म्हणूनच आम्ही स्वच्छ भारत अभियान बद्दल मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख दिला आहे.
स्वच्छ भारत अभियान मराठी माहिती, निबंध
स्वच्छ भारत अभियान अपडेट्स
यासोबतच, स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश भारतातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे हा आहे. या मोहिमेविषयी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छता आणि शौचालयांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करणे ही आहे. या स्वच्छ भारत अभियान भारत अभियानातून भारतीयांना स्वच्छतेचे महत्व आणि फायदे यांची जाणीव करून देणे हे सुद्धा आहे.
विद्यार्थी म्हणून आपण स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेचे महत्व, स्वच्छतेचे फायदे असे विषय भाषण आणि निबंध स्पर्धांमध्ये पाहू शकता. काळजी करू नका! स्वच्छ भारत अभियान या विषयावर आम्ही येथे जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. या लेखातील, आम्ही स्वच्छ भारत अभियान बद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती दिली आहे ती तीन भागात विभागली आहे.
प्रथम, आम्ही आपल्याला स्वच्छ भारत मोहिमेबद्दल महत्वाची माहिती आणि डेटा देऊ. मग आपण याची अंमलबजावणी कशी झाली आणि काय परिणाम झाले हे सुद्धा पाहू. आणि शेवटी, आपण या विषयावर निष्कर्ष काढू. येथे, आम्ही आपल्याला मुख्य माहिती देत आहोत जी आपण नंतर भाषण, निबंध किंवा परिच्छेद स्वरूपात अनुरूप करण्यासाठी सुधारू शकता आणि आम्हाला माहित आहे की आपण असे बदल करण्यासाठी पुरक आहात. स्वच्छ भारत अभियान बद्दलची हि मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख नक्कीच तुम्हाला मदत करेल. तर, चला जाणून घेऊयात स्वच्छ भारत अभियान चे महत्व, फायदे…
स्वच्छ भारत अभियान मराठी माहिती, निबंध
Swachh Bharat Abhiyan Essay, Speech in Marathi- भारत आणि पाश्चात्य देशांमधील एक सगळ्यात मोठा फरक म्हणजे स्वच्छता, त्यांची शहरे इतकी स्वच्छ आणि सुस्थितीत कशी?, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो, नाही का? आपण खूप मागे आहोत, लवकरच आपल्याला काहीतरी पावले उचलावी लागतील. आजच्या भाषणाचा विषयही तोच आहे. शुभ प्रभात, आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी मोहिमेबद्दल बोलणार आहे, आणि ती म्हणजे “स्वच्छ भारत अभियान”.
भारत सरकारचा स्वच्छ भारत मोहिम सुरु करण्याचा हा प्रथमच प्रयत्न नाही. १९९९ मध्ये, भारत सरकारने “संपूर्ण स्वच्छता अभियान” सुरू केले जे नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याचे “निर्मल भारत अभियान” असे नामकरण केले. परंतु, स्वच्छ भारत अभियानाला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संजीवनी मिळाली. आपल्या शपथविधीमध्ये सौच आणि स्वच्छता वरती बोलणारे ते जगातील पहिलेच नेते असावेत. यातून त्यांची स्वच्छतेबद्दलची आवड आणि संकल्प ही दिसतो.