essay in marathi for me giryarohan jhalo tar
Answers
■■मी गिर्यारोहक झालो तर,...!!■■
कुठे फिरायला जाताना गाडीतून उंच उंच पर्वत पाहून मनात नक्कीच ते पर्वत चढ़ायचे विचार येते.त्यावेळी असे वाटते,मी गिर्यारोहक झालो तर,...!
मी गिर्यारोहक झालो तर, मी उंच उंच पर्वत चढणार.एक यशस्वी गिर्यारोहक बनण्यासाठी मला माझ्या शारीरिक स्वास्थ्यावर खूप लक्ष द्यावे लागेल.जर मी गिर्यारोहक झालो तर, मी स्वतः ला फिट आणि स्वस्थ ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार,जेणेकरून मला उंच पर्वत न थकता चढता येतील.
गिर्यारोहक बनण्यासाठी शारीरिक स्वास्थ्यसोबत मानसिक स्वास्थ्य ही महत्वाचे आहे.जर मी गिर्यारोहक झालो तर, मी मानसिक स्वास्थ्य वर खूप लक्ष देईल.मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मी योगा करत जाईल.
मी गिर्यारोहक झालो तर ,मी पर्वत चढण्यापूर्वी योजना बनवेन आणि त्यानुसार तयारी करेन.मी हवामानाचा पूर्ण अंदाज घेऊनच पर्वत चढण्यास सुरुवात करेन.
मी गिर्यारोहक झालो तर ,एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत मी घाबरून जाणार नाही.मी अशा परिस्थितीत शांत राहून आणि संयम ठेऊन काम करेन.
खरंच,मी गिर्यारोहक झालो तर मला खूप मजा येईल.