Essay in marathi for mi jadugar zalo tar
Answers
■■मी जादूगर झालो तर,!!■■
एकदा आमच्या सोसायटीच्या पूजेच्या कार्यक्रमासाठी आम्ही एका जादूगराला बोलावले होते. त्या जादूगराचे खेळ पाहून आम्ही सगळेच खूप खुश झालो. तेव्हा, माझ्या मनात विचार आला की, मी सुद्धा जादूगर झालो तर.
मी जादूगर झालो तर, मला खूप मजा येईल. मी माझ्या जादूने या समाजातील, देशातील व संपूर्ण जगातील दुख व समस्या मिटवून टाकेन. मी या जगातून दारिद्रय, उदासीनता,आजार गायब करून टाकेन.
जादूगर झाल्यावर मी भ्रष्टाचार, जातिवाद, दहशतवाद, महिलांवर व मुलांवर होणारे अत्याचार, घरगुती हिंसा अशा प्रकारच्या समाजाला मिळालेले शाप मी जादूने समाजातून काढून टाकेन.
मी जादूगर झालो तर, मी जादूने गरीबांना व गरजू लोकांना उपयोगी येतील अशा वस्तू निर्माण करून त्यांची मदत करेन. मला लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी जादूने ज्या काही गोष्टी करता येतील, त्या मी करेन.
खरंच, मी जादूगर झालो तर, मला खूप आनंद होईल.
Answer:
this right answer.
Explanation:
Plz mark has brainly