essay in marathi on marathi
Answers
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत. काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी वाचली, न्युझिलंडच्या विमानतळावर सेहवाग आणि हरभजनसिंग यांना जवळ घाणेरडे बूट वापरले म्हणून दंड करण्यात आला. पाहिलंत? बूट - ज्यांचा सतत घाणीशीच संपर्क येतो.
त्या बुटांच्या स्वच्छतेसंबंधी न्यूझिलंडचे लोक किती जागरूक आहेत ते ? चीनमधले लोक आमच्या देशाचं वर्णन 'Spitters Country रस्त्यावर थुकणाऱ्या लोकांचा देश असं करतात. झोंबत नाही हे तुमच्या हृदयाला ? झोंबलं पाहिजे. राग न येता; लाज वाटली पाहिजे.अरे, इथे वाहणाऱ्या कांचनगंगेला तुम्ही भाळलात आणि इथे आलात, घागरी, कळगा भरभरून घेतल्यात या गंगेच्या पाण्याने, या लुटीचं मोलं नको द्यायला? मी माझं मोल मागत्येय भाजीत कीड आढळली तर जशी ओकारी येते, तशी कुठे अस्वच्छता दिसली तर ओकारी आली पाहिजे.
हा प्रवाह अप्रतिहत आणि अनिरुध्दपणे चालायला हवा असेल तर मला स्वच्छ ठेवा. माझं मोल मला द्या. हेच माझं मोल. तो स्वच्छतासम्राट सेनापती बापट. हातात झाडू घेऊन त्याने माझे रस्ते साफ केले. ज्या रस्त्याला त्या थोर माणसाचं नाव तुम्ही दिलंत; तो रस्ताच आज अस्वच्छतेचं माहेरघर बनला आहे.
हे पाहून तुमची मान शरमेने खाली झुकली पाहिजे. तुम्ही माझ्या अंगावर कागदाचे बोळे टाकता, फळांच्या साली टाकता, मनाला येईल तिथे पिचकया उडवता, एवढेच काय, मलविसर्जन करता. लाज नाही वाटत तुम्हाला त्याची ? तुम्हीच रचलेले कचऱ्याचे ढीग पाहून शिसारी नाही येत तुम्हाला ? चौकाचौकांची दलदल बनवलीत.माणसाला अन्न, निवारा यांचं दुर्भिक्ष्य आणि किड्यामकोड्यांना आणि डासांना मात्र तुम्ही अन्न पुरवता ! सुरक्षित निवारा देता. नाही पसरणार रोगराई तर काय होईल ? आज खरूज नाहीशी झाली, का ? तुम्ही स्वच्छ राहू लागलात म्हणून !
आज प्लेग नाहीसा झाला, का ? तुम्ही स्वच्छ राहू लागलात म्हणून ! पण हे रोग पुन्हा डोकं वर काढणार नाहीतच असं सांगता येणार नाही. मलेरियाने पुनरागमन केलंय. डेंग्युसारखा नवीन रोग जन्म पावलाय. का करता हा आत्मघात ? तेव्हा 'मागणं लई नाही, लई नाही ! मला स्वच्छ ठेवा!
स्वतःचे कपडे स्वच्छ ठेवायची काळजी घेता. मग माझ्या कपड्यांचं काय ? नालायक नेत्यांचे Cut - Outs लावता त्याने माझं रूप विद्रूप होतं. स्वच्छता मनात रुजली पाहिजे, तर ती कृतीत उतरते. तुमचा परिसर हा आरसा आहे. तो स्वच्छ ठेवा, की तुमच्या मनाचं स्वच्छ प्रतिबिंब त्यात उमटेल.
पटतयं का ? पटतंय ना ? मग घ्या शपथ ! माझा परिसर मी स्वच्छ ठेवीन. घाण करणारा आढळला तर मी त्याला हटकीन ! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
Answer:
तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्या ब्लॉग बद्दल अभिप्राय असल्यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉगला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्याकरीता पुढील लिंक वापरावी.
संपर्क करण्यासाठी येथे क्लीक करा
DMCA Policy साठी येथे क्लीक करा