India Languages, asked by suhanak92, 1 year ago

essay in Marathi on me pakshi zalo tar​

Answers

Answered by Anonymous
9

Answer:

मी पक्षी झालो तर

एकदा आम्ही प्रवासाला निघालो होतो. आणि रस्त्यावरील वाहतुकीच्या ट्रैफिक मुळे आमची ट्रेन चुकली। त्या क्षणी सहजच मनात विचार आला, जर मला पंख असते, मी पक्षी असतो तर!”

खरच न जर मी पक्षी असतो तर, जेव्हा कधी वाटलं तेव्हा, जिथे वाटलं तिथे आकाशात उंच भरारी घेतली असती व लगेच उडत गेलो असतो. देश विदेशी सैर करून सर्व स्थळे बघून घेतली असती. रस्त्यावरील गर्दीचा त्रास नाही,  वाहतुकीचा त्रास नाही अथवा वाहनाची किंवा कुणाच्या परवानगीची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही. रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे याची परवा नाही.

सर्वात महत्त्वाच म्हणजे कुठलाही देखावा नाही की अवडंबर नाही. स्वतःच सामर्थ्य कुणालाही दाखविण्याची गरज भासणार नाही. जीवनातील स्पर्धेत जिंकण्याकरिता प्रयत्न कराव लागणार नाही.

बसची तासन तास वाट बघण्याची गरज पडणार नाही. आईला बाजारातून आवश्यक सामान त्वरित उडत जाऊन घेऊन येणार. शाळेत अगदी वेळेवर पोहचणार. जिथे फिरायला जावसं वाटेल तिथे जाणार. किती छान आहे ही कल्पना.

पण पुढल्याच क्षणी विचार आला कि मी एकटेच, काय मजा करणार. माझे कुणीही मित्र राहणार नाही. जर मी पक्षी झालो तर मी एकटाच नव्हे तर सर्वच पक्षी व्हावे. 

follow me

Mark it brainlist

i hope it's help to you

Similar questions