essay in Marathi on the topic raigad bolo lagla tar
OR
zadache atmavrot
Answers
Answer:
लोकहो, आपलेच कौतुक आपल्या तोंडून सांगणे योग्य नाही हे मला माहीत आहे; पण माझ्या उच्चाटनासाठी येथे गोळा झालेल्या तुम्हा अविचारी लोकांना मला जागे केलेच पाहिजे. मित्रांनो, मी केवळ एक जुना वृक्ष नाही, तर मी या गावाचा संरक्षक आहे. हितकर्ता आहे. या गावाचा जन्म, या गावाचा विकास, या गावाचे आजचे स्वरूप सारे माझ्या साक्षीने झाले आहे. सुरुवातीला दोन-चार गरीब कुटुंबांनी येथे वास्तव्य केले. पण गावात त्यांनी प्रवेश केला तो माझे पूजन करून व आपल्या कुटुंबातील पुराणपुरुष असेच ते मला मानीत. कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद घेत आणि मग ही प्रथा पिढ्यान्पिढ्या चालू राहिली. कोणतीही नवीन गोष्ट करताना गावकरी प्रथम माझ्याजवळ येत व माझा कौल घेत.
"मी आयुष्यभर गावासाठी खपलो. सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या पाहण्यांना सावली दिली. केवळ माणसेच नाही, हजारो पक्षी नित्यनियमाने माझ्या अंगाखांदयावर आश्रय घेतात. दूरवरच्या वार्ता मला ऐकवितात. गावातील सारी मुले माझ्यावर सुरपारंब्या खेळत मोठी झाली. दरवर्षी कित्येक सुवासिनी वटपौर्णिमेला माझी पूजा करून अखंड सौभाग्याची मागणी करतात.
“लोकहो, याहून एक मोठे काम मी या गावासाठी करीत असतो. माझ्या उंच उंच गेलेल्या आणि दूरवर पसरलेल्या फांदयांनी मी वरुणराजाला आवाहन करतो. त्यामुळे या गावाला दुष्काळाचे संकट भेडसावत नाही. लोकहो, मला तुम्हांला हीच जाणीव करून दयायची आहे की तुम्ही गावाला नवे रूप देताना असलेल्या जुन्या वृक्षांची तोड करून एक प्रकारे अवर्षणालाच आमंत्रण देत आहात. त्यापेक्षा सुंदर गावाच्या निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावा.” इतके बोलून तो धीरगंभीर आवाज बंद झाला आणि झाडाभोवती जमलेले लोक दूर झाले ते अधिक झाडे लावण्याच्या निश्चयानेच