essay in marathi पुरग्रस्ताचे मनोगत
Answers
Answer:नमस्कार, मी कोल्हापूर या गावातील एक पूरग्रस्त बोलतोय. तुम्ही बातम्या पाहिल्या असतीलच. आमचे गाव पाण्यात बुडून गेले आहे. पाऊस पडत नाही म्हणून आपण सगळे देवाला साकडे घालत असतो नेहमी. पण आता मात्र हा पाऊस थांबावा म्हणून प्रार्थना करतोय आम्ही.
आमचं घरदार, शेती सगळं वाहून गेलेय हो. आमची गुरे पाण्यात बुडून मरून गेली. त्यांना आम्ही वाचवू शकलो नाही. आम्हाला विस्थापित व्हावं लागलं आहे. लहान मुले, म्हातारी माणसे यांना प्रचंड त्रास झालाय.
भारतीय सैन्य आणि पोलीस दल आमच्या मदतीसाठी धावून आले आहेत. सगळीकडून मदतीचा ओघ सुरु आहे. पाणी ओसरले की आम्हाला सगळ्यांना मोडलेले संसार पुन्हा उभे करावे लागणार आहेत. त्यात आता साथीचे रोग थैमान घालतील. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्हाला शक्य तेवढी मदत लवकरात लवकर करावी एवढीच आम्ही अपेक्षा करतोय.
Explanation:
Answer:
hey here your answer please mark brilliant please