Hindi, asked by vitansinghai3261, 7 months ago

Essay in parrot marathi

Answers

Answered by Sarbjit310
0

Answer:नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता पक्षी पोपट निबंध मराठी Essay On Parrot In Marathi पोपट या प्राण्यावर निबंध बघणार आहोत. मित्रांनो वर्णनात्मक निबंध लिहीत असताना विषय वेगवेगळे दिले जातात त्यानुसार आपल्या जवळ असलेली किंवा माहित असलेली माहिती याची लेखन शैली व बारकावे वेगवेगळ्या पद्धतीने शाब्दिक चित्रकृती साधून योग्य सांगड घालून प्रस्तुतीकरण करणे गरजेचे असते जसे की निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात खालील प्रमाणे :-

माझा आवडता पक्षी पोपट निबंध मराठी

माझा आवडता प्राणी पोपट

पोपट विषयी माहिती मराठी

भारतीय पोपट माहिती

पोपटाची माहिती मराठी

पोपटा विषयी माहिती मराठी

पोपट माहिती मराठी मध्ये

पोपट पक्षाची माहिती मराठी

पोपट या पक्षाची माहिती मराठी

अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे उपक्रम दिले असतात या विषयाला अनुसरून कुठे माहितीपर, तर कुठे सविस्तर, तर कुठे वर्गीकरण करून इत्यादी प्रकारे लेखन करणे गरजेचे असते यातील आज आपण वर्णनात्मक निबंध बघणार आहोत चला तर मग सुरु करूया

पोपट हा पाळीव पाणी आहे. पोपटाचा रंग हिरवा असतो. त्याची चोच लाल व बाकदार असते. त्याचे डोळे गोल व मन यासारखे चमकदार असतात. शेपटी लांब असते. हिरवी पिसे असतात. पायांची नखे व आकार असा असतो की तो फांदीवर घट्ट बसू शकतो.

पोपटाला हिरवी मिरची, हरभऱ्याची डाळ, आणि पेरू खूप आवडतो. पोपत मिठू मिठू असा आवाज करतो. पोपट जंगलात झाडावर राहतो. पारधी त्याला पकडतात आणि पिंजर्‍यात ठेवतात. पिंजरा ठेवल्याने त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. प्रत्येक पाखराला आकाशात उंच उडायला आवडते. पोपटाचे अनेक जाती असतात.

लोक पोटाला विकत घेऊन त्याचा पिंजरा घरात ठेवतात. शिकवले तर पोपट बोलायला शिकतो जसे की " या बसा" राम राम, नमस्कार, सुस्वागतम वगैरे शब्द आपल्या गोड आवाजात म्हणतो. पोपटाला रघु असेही म्हणतात. लहान मुलांना पोपट खूप आवडतो

वरील निबंध इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषा या विषयाला खूपच सहाय्यक राहील निबंधामध्ये काही चुका झाल्या असल्यास, काही त्रुटी असल्यास आपण कमेंट करून च्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा काही सुधारणा असतील तर त्या सांगा तुम्हाला कुठल्या विषयावर निबंध लेखन हवे असेल तर विषय सुचवा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का.

Answered by prembhai2501
1

Answer:

पोपट हा एक अतिशय सुंदर, अविश्वसनीय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा पक्षी आहे. जगभरात सुमारे ३७२ प्रजातींचे पोपट आढळतात. पोपट हे चमकदार रंगाचे आढळतात. भारतातील पोपट हे हिरव्या रंगाचे असतात.

त्यांना लाल वक्राकार चोच, दोन पाय ज्यांना प्रत्येकी चार चार नख्या असतात तसेच त्यांना हिरवी पिसे असतात. त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचा वक्राकार वलय आढळतो. पोपट हे उष्णकटिबंधीय हवामानातच आढळतात. ते असे एकमेव पक्षी आहेत जे तोंडात अन्न आणण्यासाठी त्याच्या पायाचा वापर करू शकतात.

पोपटांकडे सर्वात कणखर चोच असते. ते सर्वात कठीण कवच असलेले पदार्थ देखील आपल्या चोचीने फोडू शकतात. पक्षांच्या सर्व जातींपैकी पोपटाला सर्वात बुद्धिमान पक्षी मानले जाते कारण ते उत्तम प्रकारे ऐकलेल्या आवाजाची नक्कल करू शकतात.

भारतीय पोपटांचे आयुष्य हे सरासरी २०-३० वर्ष्यापर्यंत असते. ते बहुदा कीटक, फळे, बियाणे खातात. हे पदार्थ खाण्यामध्ये त्यांची वक्राकार चोच त्यांना खूप उपयुक्त ठरते. त्याला मुख्यतः पेरू, कठीण कवचाची फळे आवडतात

Similar questions