essay of dream of my future in marathi
Answers
Answer:
मला डॉक्टर व्हायचे आहे. त्यासाठी आमच्या डॉक्टरांनाही मी सांगितले आहे. ते मला काही पुस्तके वाचायला देतात, ती मी वाचते... माझी माझ्या परीने तयारी सुरू झाली आहे. पण अकरावी, बारावीसाठी क्लास करता आला तर मला त्याचा फायदा होईल... पर्णिका धाकोरकर सांगते. पर्णिकाचे आई-वडील तिचे हे उच्चशिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी झटत आहेत. तरी आर्थिक पाठबळ मिळाले तर तिच्या या स्वप्नाच्या दिशेने प्रवास थोडा सोपा होईल असे त्यांना वाटते.
अभ्यासू पर्णिकाला कुटुंबीयांची साथ
मालाडच्या खोत डोंगरी परिसरात राहणारी पर्णिका. टेकडीच्या उतारावर वसलेली तिची वस्ती. घर पक्के, धाकोरकर कुटुंबीयांचे स्वतःचे. तिचे वडील पेपरविक्रेते. घरामध्ये एकूण नऊ माणसे. तळमजला आणि वरती माडी असे घर. या घरामध्येच बसून ती अभ्यास करते आणि घरातील मंडळीही तिच्या अभ्यासामध्ये इतर कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतात. पर्णिकाने दहावीपर्यंतचे शिक्षण चिल्ड्रन्स अकॅडमी या शाळेतून घेतले. दहावीला तिला ८९.८० टक्के गुण मिळाले आहेत. एवढे मार्क मिळवणारी घरातील ती पहिलीच. तिची आई बारावी शिकलेली तर वडील दहावी. तिची अभ्यासाची जिद्द पाहून ते तिची उच्चशिक्षणाची सगळी स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आर्थिक बाजू त्यासाठी पुरेशी पडेल का याची खात्री नाही. म्हणूनच त्यांना 'मटा'च्या वाचकांकडून मदतीची अपेक्षा आहे.
तिचा वैद्यकीय शिक्षणाचा खर्च घरातील नऊ जणांना खायला घालून परवडणारा नाही याची तिच्या आई-वडीलांना जाणीव आहे. पर्णिकाचे काका महापालिकेमध्ये कामगार म्हणून काम करतात. पर्णिकाला एक धाकटा भाऊ आहे. पर्णिकाव्यतिरिक्त इतर भावंडांचेही शिक्षण करायचे असल्याने आपल्या या हुशार मुलीचे स्वप्न कसे पूर्ण करायचे ही चिंता सध्या त्यांना सतावत आहेत. पण काही झाले तरी हे स्वप्न पूर्ण करणारच असा निश्चयही तिचे वडील व्यक्त करतात.
पर्णिकाच्या वडिलांचा मालाड स्टेशनजवळ पेपरचा स्टॉल आहे. तिचे आजोबाही पेपरविक्रेते होते. गेली अनेक वर्षे टेकडीवरील या घरात काढल्यानंतर आता त्यांचे एसआरएअंतर्गत घर तयार होत आहे. नऊ जणांचे कुटुंब सांभाळणे तसे कठीणच आहे. पर्णिकाची आई नोकरी करत नाही. ती सकाळी कधी कधी स्टॉलवर पेपरविक्रीसाठी जाते. पर्णिकाच्या अभ्यासात अडथळे नको म्हणून अजून तरी या सगळ्या धबडग्यापासून तिच्या आई-वडिलांनी तिला दूर ठेवले आहे. दहावीला तिने शाळेमधून मिळणाऱ्या मार्गदर्शनाच्या बळावर गुण कमावले. मात्र अकरावी-बारावीमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी तिला क्लासची गरज आहे. परीक्षा द्यायची तर पूर्ण तयारी करूनच यावर तिचा ठाम विश्वास आहे. वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग सुकर नाही. म्हणूनच तिने आधीपासूनच तिच्या डॉक्टरांना काय तयारी करायला लागेल, कशी तयारी करायला लागेल याबद्दल विचारणा सुरू केली आहे. शाळेचे माध्यम इंग्रजी असल्याने तिला पुढील तयारीसाठी भाषेची अडचण येणार नाही असे ती सांगते. योग्य मार्गदर्शन, पूर्वतयारी या बळावर तिला हे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.
महाराष्ट्र टाइम्सवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स