essay of my favourite hobby in marathi
Answers
माझे आवडते हॉबी वाचन
माझा आवडता छंद वाचत आहे. मी मुक्त आहे तेव्हा मला एक पुस्तक वाचायला मजा वाटते. मीमी चार वर्षांचा होतो तेव्हा हे करू लागलो. मी पहिल्यांदा हे केले, मला स्वारस्य वाटले. म्हणून मीवाचन शिक्षक नेहमीच मला कठीण शब्द वाचण्यास शिकवतात. मी आनंदी होतेजेव्हा मी आनंदी शेवटचा एक कथा वाचतो मी एक गुप्तचर कथा वाचली तेव्हा मला खूप आनंद झाला.मला वाचनाची आवड आहे कारण मी माझ्या कल्पनारम्य जगांची माहिती शोधू इच्छितो"हॅरी पॉटर" हे लिहिणारे लेखक, जे. के. रॉलिंग भरपूर आहेतवाचण्याचे फायदे वाचन मला आरामशीर आणि शांत करू शकते मी नवीन शिकू शकतोशब्दसंग्रह आयटम मग मी आणखी इंग्रजी सुधारू शकते. शिवाय, ते मला देऊ शकतातअमर्यादित कल्पनाशक्ती, तर मी भविष्यात पुस्तके लिहू शकतो. मी वेगळं शिकू शकतोजगातील इतर देशांमधील संस्कृती आणि रीतिरिवाज देखील आहेत. मी दररोज कमीत कमी एक तास वाचतो. मी स्वत: पुस्तके वाचतो. मी सहसा ते वाचाघरी. माझी इच्छा आहे की मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचू शकेन कारण ती खूपच असू शकतेआव्हानात्मक
माझा आवडता छंद हा नेहमी विचारला जाणारा मराठी निबंध विषय आहे, कधी कधी भाषणासाठी सुद्धा हा विषय विचारू शकतात. इथे या नमुना निबंधामध्ये आम्ही वाचन या छंदाबद्दल लिहणार आहोत. प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असू शकतात. कोणाला गायन, नृत्य, क्रिकेट, लिखाण, चित्रकला आदी आवडू शकते. इथे दिलेल्या निबंधातून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता आणि त्या प्रकारे आपल्या आवडत्या छंदावर निबंध लिहू शकता.
माझा आवडता छंद वाचन – मराठी निबंध (Essay on My Hobby in Marathi)
छंद म्हणजे काय? आपल्या मोकळ्या वेळातला विरंगुळा. तशा माझ्या विरंगुळ्याच्या खूप गोष्टी आहेत; जसे संगीत ऐकणे, क्रिकेट खेळणे, टीवी पाहणे, चित्रकला आदी. पण माझा आवडता छंद आहे वाचन. तसे वाचन हे कंटाळवाणे समजले जाते आणि माझ्या वयाची मुले-मुली तर वाचणं पूर्णपणे टाळतात. वाचन मला ऐवढे आवडते की मी फक्त ते फावल्या वेळेत करत नाही तर त्याच्यासाठी अभ्यास, खेळ, प्रकल्पांमधून वेळ काढतो.
सर्वसाधारणपणे वाचनाच्या छंदाबद्दल खूप गैरसमज आहेत. वाचन हे कंटाळवाणा मानले जाते. वाचन म्हणजे फक्त पाठ्य पुस्तक वाचणे नाही. तुम्ही करमणुकीसाठी कॉमिक्स वाचू शकता, विविध प्रकारच्या कादंबऱ्या सुद्धा आहेत, गोष्टींची पुस्तके, विविध मॅगझिन्स आणि भरपूर काही. कुणाला काव्यवाचन आवडू शकते तर कोणाला मराठी साहित्य आवडू शकते. मला मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी साहित्य, गोष्टी,आर्टिकल्स, ब्लॉग वाचायलाही आवडते.
अजून एक गैरसमज जो मुलांना वाचनाच्या छंदापासून परावृत्त करतो तो म्हणजे आपण जे वाचतो ते पाठ करायचे असते. हे सरासर चुकीचे आहे. वाचन जर छंद असेल तर तो अभ्यास किंवा कामासारखा वाटला नाही पाहिजे. वाचन हे मजा म्हणूनही करता येऊ शकते, त्यातून निराळ्या प्रकारचा आनंद मिळतो.
आपण वाचनाची आवड निर्माण करू शकतो आणि ती पुढे जाऊन आपल्या छंद बनू शकते. वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर सुरवातीला आपल्याला जे विषय आवडतात फक्त त्याचेच वाचन करावे. मला खेळांबद्दल वाचायला आवडते म्हणून मी माझ्या मामा कडून स्पोर्ट्स मॅगझीन घेऊन येतो, आणि सुट्टीच्या दिवशी वाचतो. या मॅगझीन वाचून मला कुठल्याही परीक्षेत मार्क्स मिळणार नाही, कोणी माझी परीक्षा घेणार नाही. मी ती वाचतो कारण मला आवड आहे. या मॅगझीन वाचून मला ऑलम्पिक खेळांचा इतिहास कळला, मला हेही कळले की अपंग (दिव्यांग) खेळाडूंसाठी पॅराऑलम्पिक सुद्धा असतात आणि अशा खूप काही नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या.
वाचनामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो. जेव्हा आपणास आजूबाजूच्या गोष्टींबद्दल माहिती असते तेव्हा आपण विविध संभाषणात भाग घेऊ शकतो. यामुळे आपले संवाद कौशल वाढते, व्यासपीठ साहस (Stage Daring) वाढते आणि याचा आपल्याला खूप फायदा होतो. आजकाल डिजिटल क्रांतीमुळे जग खूप वेगाने बदलत आहे, रोज नवीन तंत्रे, पद्धती, वस्तू बाजारात येत आहेत. जगभरात विविध प्रकारच्या घडामोडी होत आहेत त्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. अशा वेळी कमीत कमी वर्तमानपत्र वाचण्याची सवय तर आपण जोपासली पाहिजेच.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाचनाचा छंद जोपासणे अगदी सोपे झाले आहे. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि त्यावर इंटरनेट आहे. याच्या साहाय्याने आपण जगभरातल्या कुठल्याही गोष्टी, कादंबऱ्या, आर्टिकल्स, व्हाईट पेपर, ब्लॉग, गाईड्स वाचू शकतो. त्यासाठी आपल्याला वेळ काढून वाचनालय जाण्याची गरज नाही.
जरुरी नाही की तुम्ही काहीतरी खूप गंभीर गोष्ट वाचली पाहिजे. इंटरनेटवर ती तुम्ही अगदी जोक्स, मीम पासून क्वांटम फिजिक्स पर्यंत सगळ काही वाचू शकता. जगभरातल्या लाखो लोकांनी आपले अनुभव, कल्पना, विचार विविध रूपांमध्ये मांडून ठेवले आहेत. आपण बस मधून प्रवास करताना किंवा इतर फावल्या वेळी मध्ये अशा गमतीशीर गोष्टी नक्कीच वाचू शकतो. अशा भरपूर वेबसाईटचा आहे कि जिथे तुम्ही आपला इमेल आयडी दिल्यास ते दर दिवशी विविध प्रकारचे आर्टिकल तुम्हाला पाठवतात.
वाचनामुळे आपल्याला आजूबाजूच्या, जगभराच्या घडामोडी माहिती पडतात याचा आपल्याला रोजच्या आयुष्यात आणि आपल्या शिक्षणामध्ये, करिअरमध्ये ही उपयोग होतो. त्यामुळे आपण आपले करिअर पर्याय स्वतः निवडू शकतो, स्वतः आपल्या आयुष्याच्या मार्ग निवडू शकतो. कुठली नवीन तंत्रे विकसित होत आहेत, भविष्यात कुठले जॉब असतील, त्यातली संधी काय; हे सर्व वाचनातूनच कळते.
जगाच्या पाठीवर कुठलाही महान व्यक्ती घ्या त्यांच्यामध्ये एक साम्य तुम्हाला सापडेल ते म्हणजे त्या सगळ्यांना वाचनाचा फक्त छंद नाही तर आवड होती. ते सगळे उत्कट वाचक (Ardent Readers) होते. वाचनामुळे आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकू शकतो, हळूहळू परिपक्व होतो. त्याचा फायदा आपल्याला, आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि देशालाही फायदा होऊ शकतो. आजकालच्या धावत्या युगात, तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाला खूप किंमत आहे अशावेळी ज्ञानार्जनाचा एकच मार्ग आहे तो म्हणजे वाचन.
वाचनाचे खूप सारे फायदे आहेत तोटे तर नक्कीच नाही. वाचनाने आपल्या मनाला शांतता मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि भविष्याचा मार्गही मिळतो. वाचनाकडे फक्त एक छंद म्हणून नाही तर, काळाची गरज म्हणून पाहिले पाहिजे.
FOLLOW ME