Essay on 9waari Saari in Marathi language
Answers
Answer:
marathi mai hi zaruri hai kya dear mate
ENGLISH ME NAHI
■■नऊवारी साडी■■
नऊवारी साडी हे महाराष्ट्रीयन बायकांचे पारंपरिक वस्त्र आहे. एखाद्या कार्यक्रमाच्या दिवशी किंवा खास प्रसांगाच्या वेळी वेळी नऊवारी साड़ी नेसली जाते.नऊवारी साडीला काष्टा, लुगड़ा सुद्धा म्हटले जाते.या साडीत नऊ वार असल्यामुळे,तिला नऊवारी साडी असे म्हटले जाते.
पूर्वी युद्धाच्या वेळी, मराठा बायकांना युद्धात आरामाने हालचाल करता यावे म्हणून नऊवारी साडी बनवण्यात आली होती..नऊवारी साडी नेसताना इतर साड्यांसारखे पेटीकोट घालायची गरज लागत नाही.म्हणून,नऊवारी साडीला अखंड वस्त्र सुद्धा म्हटले जाते.
विभिन्न भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नऊवारी साडी नेसली जाते.नऊवारी साडी लावणी पद्धतीने, पेशवाई पद्धतीने,ब्राह्मणी पद्धतीने,कोल्हापुरी पद्धतीने,कोळी पद्धतीने,मराठा पद्धतीने अशा वेगवेगळ्या पद्धतीने नेसली जाते.
मूलतः नऊवारी साड़ी प्युअर कॉटन पासून बनवल्या जात असत पण आता नऊवारी साड्या रेशीम आणि सॅटिन कापडापासून सुद्धा बनवल्या जातात.आज बाजारात वेगवेगळ्या रंग,डिज़ाइन आणि प्रकारच्या नऊवारी सड्या पाहायला मिळतात.