essay on a book I have read in marathi?
Answers
मी वाचलेले पुस्तक.
मी अनेक पुस्तके वाचली, पण एक पुस्तक जो माझ्या नेहमी लक्षात राहील तो म्हणजे नारायण धारप लिखित अनोळखी दिशा भाग -१.
अनोळखी दिशा एक गोष्टींचा संग्रह आहे. एकूण २० भयकथा या पुस्तकात आहेत . ह्यात अनेक भयपट गोष्टी आहेत. नारायण धारप यांचे लेखन असे आहे की वाचताना आपण त्या गोष्टीत हरवून जातो. मी पुस्तक वाचताना थक्क होतो. एका क्षणाला असे वाटले की खरोखर मी त्या पात्रात आहे आणि सगळं अनुभवत आहे.
साऱ्या गोष्टीत भुताचा सहवास आहे. भयकथांचा हा संग्रह खरंच अति भयानक आहे. ह्या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत पण मला जी सर्वात जास्त आवडली तिचा सारांश पुढील प्रमाणे आहे.
एक मुलगा शाळेत जात असतो. वाटेवर एक जून घर लागत. रोज ते घर त्याला दिसत असत. एक दिवस त्याला घरी यायला उशीर होतो. त्या जुन्या घरापाशी येताच त्याला विचित्र आवाज ऐकू येतात. कोणीतरी बोलत असत कि आई मी आलोय, दार उघड . जोरात वारा सुटतो. तो मुलगा घाबरतो आणि घरी पाळतो. त्याला ताप येतो. त्याचे आई वडील चिंतेत असतात. खूप विचारल्यावर तो सगळं खरं सांगतो. तपासणी करण्यासाठी ते लोक जेव्हा तिथे रात्री जातात तेव्हा समजतं कि खरंच असा होतंय.सगळे थक्क होतात. तेवढ्यात त्या मुलाची आई घरात जाते आणि बोलते, बाळा ये, मी तुझी वाट पाहत होती. आणि दोनी हाथ मोकळे करते. वर जोरात वाहून तिच्या मिठीत जातो आणि त्या आत्म्याला आईच्या प्रेमाने मुक्ती मिळते.