Essay on a crop in Marathi
Answers
Answer:
bzbxxbbxhzbzbzbzbsbbzbzbsnznsnznnznznznnznz bichhadna buri bnd gf fir gyi chl gyi chl bf
◆◆तांदळाचे पीक (essay on a crop)◆◆
तांदूळ पूर्ण जगामध्ये मुख्य तृणधान्य पीक आहे.लोक तांदूळ म्हणजेच भाताचा इतर कुठल्या धान्यापेक्षा जास्त सेवन करतात.आशिया भागात तांदूळ मुख्य धान्य आहे आणि इकडची लोक जेवणासाठी तांदळावर अवलंबून असतात.
तांदळाच्या उत्पादनासाठी भारत एक प्रमुख केंद्र आहे. भारत तांदळाच्या उत्पादनामध्ये दूसरा सर्वात मोठा देश आहे.भारताच्या प्रामुख्याने पूर्व आणि दक्षिण भागांमध्ये तांदळाची लागवड केली जाते.
तांदूळ एक महत्वपूर्ण खरीप पीक आहे. तांदळाला वाढण्यासाठी खूप पाणी लागते. कमी पावसाच्या क्षेत्रांमध्ये सिंचनाद्वारे तांदळाच्या पीकाला पाणी पुरवले जाते.
तांदळामध्ये उपस्थित असलेले सगळ्यात महत्वाचे घटक म्हणजे कार्बोहाइड्रेट, ज्यामुळे याचे सेवन केल्यावर आपल्याला लगेच ऊर्जा मिळते.
तांदळाच्या पीठात भरपूर प्रमाणात स्टार्च असते,म्हणून याचा प्रयोग वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवण्यात केला जातो. पशुधन प्रजनन आणि कागदी लगद्याच्या उत्पादनासाठी सुद्धा तांदळाचा उपयोग केला जातो.