Essay on advantages and disadvantages of internet in marathi language
Answers
Answer:
इंटरनेट हा विज्ञानाच्या महान शोधांपैकी एक आहे.आज इंटरनेट आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनलेला आहे.
इंटरनेटचे अनेक फायदे आहेत.इंटरनेटमुळे आपल्याला विविध गोष्टींची,विषयांची माहिती मिळते.इंटरनेट सेवेचा उपयोग करून आपण गूगल किंवा यूट्यूब वर वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो,जगाबद्दल आपले ज्ञान वाढते,अभ्यासात व कामात आपल्याला मदत होते.इंटरनेटमुळे ईमेल, व्हाट्सअप,वीडियो कॉल, फेसबुक यांचा वापर करून आपण आपल्या मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी संपर्क साधू शकतो.जीपीएस तंत्रज्ञानाने इंटरनेटचा उपयोग करून आपल्याला जगातील बहुतांश जागांचे नकाशे मिळू शकतात,त्यामुळे या ठिकाणी पोहोचणे सोयीस्कर बनले आहे.इंटरनेटमुळे ऑनलाइन शॉपिंग,घरबसल्या काम, बैंक खात्याची माहिती ठेवता येते.
इंटरनेटचे नुकसान देखील आहेत.काही लोक इंटरनेटचा दुरुपयोग करून सोशल मीडियाच्या मदतीने सामाजिक हिंसा,खोट्या बातम्या पसरवतात.इंटरनेटमुळे काही लोकांचा अभ्यासात व कामात लक्ष लागत नाही.लोक बराच वेळ सोशल मीडिया व इतर अप्समध्ये घालवत असल्यामुळे,त्यांची महत्वाची कामे होत नाहीत.इंटरनेटमुळे लोकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. काही लोक सायबर छेडछाड आणि सायबर गुंडगिरीचा आणि इतर वेगवेगळ्या सायबर गुन्हांचा शिकार होतात.लोक इंटरनेटवर जास्त वेळ घालवू लागली आहेत.
अशा प्रकारे,इंटरनेटचे दोन्ही फायदे तसेच नुकसान देखील आहेत.
Explanation:
Explanation:
very excellent explanation