Essay on Air pollution in Marathi: मराठीमध्ये वायू प्रदूषणावर निबंध
Answers
वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे प्रदूषण. मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचाअविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते.भारतात गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.ज्वालामुखी, नैसर्गिकरीत्या लागणारे जंगलातील वणवे,वाहने, कारखाने इत्यादींमुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे.
वायुप्रदुषण म्हणजे वातावरणाचे प्रदुषण. वायुप्रदुषण मानवी जीवनास खुप हानिकारक आहे. हवेतील अति प्रमाणात असलेले सल्फर डायॉक्साईड ,नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यामुळे हवेचे प्रदुषण होते. काही नैसर्गिक आपत्ती मुळे जसे ज्वालामुखी, दलदल ,जंगलातील वणवे .तसेच काही मानवनिर्मित वाहने ,कारखाने ,वीजनिर्मिती ,शेती यामुळे वायुप्रदुषण होते. वायुप्रदुषणाचा श्वसन संस्थेवर खुप घातक परिणाम होतात. आपण सर्वानी यावर उपाय करायला पाहीजे. त्यासाठी झाडे लावावी , वाहनांचा वापर कमी करावा , सौर ऊर्जेचा वापर जास्त करावा.