essay on animals in marathi
Answers
मांजराच्या हालचाली फार सुंदर असतात . मांजर ऐटीत बसते . त्या वेळी ती जणू एखाद्या महाराणीसारखी वाटते . ती वाघासारखी रुबाबात धीम्या गतीने चालते म्हणून तिला 'वाघाची मावशी' म्हणतात. उंचावरून उडी मारताना ती पाठीची कमान करते आणी पावलांवर अलगद उतरते . उंच भिंतीच्या कठड्यावरूनही ती सहजतेने चालते .
आम्ही एक मांजर पाळली आहे . तिला आम्ही 'मनी' म्हणतो. आमची मनी नेहमी माझ्या आसपास वावरते . मी अभ्यास करते, तेव्हा ती माझ्या बाजूला बसते . ती नेहमी आपले अंग जिभेने स्वच्छ करते . तिला उंदीर फार घाबरतात . तिच्यामुळे घरात उंदीर येत नाहीत .
मनीशी खेळताना माल खूप आनंद मिळतो .
Answer:
प्राचीन काळापासून प्राणी माणसांची मदत करत आहेत.जगभर विविध प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात.
प्रत्येक प्राणी मनुष्यासाठी किंवा पर्यावरणासाठी उपयोगी असतो.प्राण्यांपासून आपल्याला खाण्यासाठी मांस,दूध मिळते.लोकरी कपडे व रेशमी कपडे बनवण्यासाठी त्यांच्याकडून लोकर व रेशीम मिळते.त्यांचा उपयोग शेतामध्ये,वाहतूक करण्यासाठी,भार उचलण्यासाठी केला जातो.मधमाशांपासून आरोग्यासाठी उत्तम आणि औषधीगुण असलेले मध मिळते.त्यांच्याकडून बूट,बेल्ट,बॅग बनवण्यासाठी चामडे मिळते.काही प्राण्यांच्या केसांचा उपयोग ब्रश बनवण्यासाठी केला जातो.
प्राणी पर्यावरण साफ ठेवायला मदत करतात.निसर्गाचा तालमेल टिकून ठेवतात.प्राण्यांच्या शेणापासून बनवलेले खत मातीची सुपीकता टिकून ठेवते.
प्राणी आपले चांगले सोबती बनून आपली साथ देत असतात.त्यांच्या सहवासात राहून आपल्याला आनंद मिळतो.असे हे प्राणी मनुष्यासाठी निसर्गाची अनमोल भेट आहेत.
Explanation: