India Languages, asked by shrey532, 1 year ago

essay on badalta bharat in marathi​

Answers

Answered by moamansheikh5
5
समाजजीवनाच्या एखाद्या क्षेत्रात होणारा बदल इतका व्यापक असतो, की जीवनाच्या इतर क्षेत्रांवर त्याचा आपोआप परिणाम होतो, गेल्या दशकात जागतिकीकरण या संबोधनाने ओळखल्या जाणा-या मुख्यत: आर्थिक क्षेत्रातील बदलामुळे राजकारणापासून समाजकारणापर्यंत जीवनाची विविध क्षेत्रे झपाटयाने बदलत चालली आहेत. हे बदल किती दूरगामी परिणाम करणारे आहेत, हे अर्थशास्त्राचे अभ्यासक वेगवेगळया आकडेवारीच्या साह्याने आपल्याला सांगत असतातच, पंरतु समाजजीवनात घडणा-या अशा बदलाचे स्वरूप मानवी जीवनात घडणाऱ्या अशा बदलातून, लोकांच्या मानसिकतेच्या बदलातून जेवढे ठळकपणे कळू शकते तेवढे रूक्ष आकडेवारीने लक्षात येत नाही. एक संवेदनाक्षम नागरिक म्हणून समाजजीवनातील या परिवर्तनाचा मागोवा घेण्यासाठी ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांनी देशभर भ्रमंती केली आणि आपला पाहिलेला ‘बदलता भारत’ काही लेखांच्या माध्यमातून टिपला. त्या लेखांचा संग्रह ‘मौज’ने प्रसिध्द केला आहे. सकृतदर्शनी केवळ आर्थिक वाटणारे हे बदल समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे आहेत, याची त्यांना जाणीव आहे, म्हणून त्यांनी आपल्या अवलोकनाचा परीघ संकुचित केलेला नाही.

Answered by Hansika4871
1

ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, शोध ह्यांच्या सहाय्याने वैचारिक, सामाजिक, औद्योगिक, कृषी क्षेत्रात नवीन उचांक झाले. दळण वळणाची साधन वाढली, व्यापार वाढला, उद्योग धंदे वाढले त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध झाला. देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थितीत वाढ झाली. शिक्षणाच्या वाटा वाढल्याने इलेक्ट्रॉनिक युगाची नांदी झाली. घरबसल्या लोकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध झाल्या. आपल्या आवडत्या गोष्टी लोक मोबाईल फोन च्या माध्यमातून घर बसल्यास माग वायला लागले. नुकतीच चंद्रयानाची मोहीम इस्रो ने पार पाडली हे भारतासाठी कौतुकाची बाब होती. येत्या काही वर्षात ह्या गोष्टी उदा.

मेट्रो, मोनो रेल, बुल्लेटट्रेन, इलेक्ट्रिक गाड्या, इलेक्ट्रिक बस ह्यांचे जाळे भारत भर पसरणार आहे आणि एकविसाव्या शतकातला भारत विकासाच्या द्दृष्टीने वाटचाल करणार आहे.

Similar questions